मातृशक्तीचा जागर : जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
![]()
मातृशक्तीचा जागर : जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
अमळनेर प्रतिनिधी
आज दि 12 जानेवारी रोजी सौ रेखा वाल्मीक मराठे ह्यांच्या निवासस्थानी जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली,त्यात श्री नारायणी व शारदा भजनि मंडळ तसेच जिजाऊ ज्येष्ठ नागरिक मंडळ, देशमुख नगर महिला मंडळ,पूजाताई ,रजनीताई, छायाताई, पूनम ताई वंदनाताई,सुवर्णाताई,मेघाताई,सुदर्शनाताई तसेच अनेक महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.ज्ञानेश्री पाटील हिने स्वामी विवेकानंद ह्यांची व सारंग पाटील ह्याने बालशिवाजी ,रेखा मराठे ह्यांनी माँसाहेब जिजाऊ अशा विविध व्यक्तिरेखा साकारल्या,जिजाऊ वंदना म्हणण्यात आली, विविध भजने, पोवाडे व व्याख्याने दिलीत.क्रांतिज्योती ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.उषाताई पाटील ह्यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

