दहिवद गावात आईच्या आठवणींना भक्तीची साथ — कै. सौ. वत्सलाबाई पाटील उदया पुण्यस्मरण सोहळा
1 min read

दहिवद गावात आईच्या आठवणींना भक्तीची साथ — कै. सौ. वत्सलाबाई पाटील उदया पुण्यस्मरण सोहळा

Loading

दहिवद गावात आईच्या आठवणींना भक्तीची साथ — कै. सौ. वत्सलाबाई पाटील उदया पुण्यस्मरण सोहळा

अमळनेर प्रतिनिधी :
दहिवद (ता. अमळनेर) गावाच्या सामाजिक, कौटुंबिक व धार्मिक जीवनात मोलाचा ठसा उमटविणाऱ्या कै. सौ. वत्सलाबाई रामभाऊ पाटील (वत्साई) यांचे १० वे पुण्यस्मरण श्रद्धा, भक्ती आणि भावनिक वातावरणात साजरे करण्यात येत आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दि. १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री ७ वाजता दहिवद येथील राजे छत्रपती संभाजी चौकात जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी ह.भ.प. सौ. कांचनताई जगताप, अध्यक्ष – निवृत्तीनाथ समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर, या प्रमुख कीर्तनकार म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या प्रभावी व भावस्पर्शी कीर्तनातून कै. वत्सलाबाई यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.
कै. सौ. वत्सलाबाई पाटील या केवळ एक आई नव्हत्या, तर त्या कुटुंबासाठी संस्कारांची शाळा, त्यागाची मूर्ती आणि मायेचा अखंड झरा होत्या. साधेपणा, कष्टाळूपणा, परोपकार, धार्मिक श्रद्धा व सामाजिक जाणीव हे गुण त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य होते. कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर त्यांनी संस्कारांची बीजे रोवली. त्यांच्या शिकवणुकीतूनच आज कुटुंबातील सदस्य विविध क्षेत्रात सामाजिक व प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत.
या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन सौ. सुषमाताई वासुदेव देसले-पाटील (संचालक – कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर; विभागीय अध्यक्ष – उत्तर महाराष्ट्र, सरपंच परिषद मुंबई; प्रथम लोकनियुक्त आदर्श महिला सरपंच, ग्रा.पं. दहिवद) यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
यावेळी श्री. रामभाऊ कौतिक पाटील, श्री. ज्ञानेश्वर रामभाऊ पाटील, श्री. ईश्वर रामभाऊ पाटील, श्री. कैलास रामभाऊ देसले, श्री. वासुदेव रामभाऊ देसले (DYSP – उपविभागीय पोलीस अधिकारी, त्र्यंबकेश्वर पेठ विभाग, नाशिक) तसेच श्री. भटू बारीकराव पाटील व समस्त देसले-पाटील परिवार यांनी आवाहन केले आहे.
आणि भजनी मंडळ, दहिवद यांचे सहकार्य लाभणार आहे.
कै. वत्सलाबाई पाटील यांचे जीवन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन कार्यक्रमास दहिवद व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संघर्षातून संस्कार घडविणाऱ्या १५ मातृशक्तींना ‘वत्साई अग्निपुष्प पुरस्कार’

अत्यंत हालाखीच्या व प्रतिकूल परिस्थितीतही पतीचा आधार नसताना किंवा व्यसनाधीन पती असतानाही आपल्या मुलांचे उज्ज्वल व यशस्वी भविष्य घडविणाऱ्या गावातील १५ कर्तृत्ववान महिलांचा “वत्साई अग्निपुष्प पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते साडी, शाल, स्मृतिचिन्ह (मोमेंटो) व पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात येणार आहे.
असा हा सन्माननीय उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती
सौ. सुषमाताई वासुदेव देसले-पाटील
(प्रथम लोकनियुक्त सरपंच – दहिवद, संचालक – कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर, विभागीय अध्यक्ष – नाशिक विभाग, सरपंच परिषद मुंबई)
यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *