लोकनियुक्त नेतृत्वाचा सन्मान! अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा दिमाखदार सत्कार  , डॉ. परिक्षीत बाविस्कर व प्रशांत निकम यांचा सहपत्नी गौरव; ज्येष्ठ नेते  मा.आ. डॉ. बी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा
1 min read

लोकनियुक्त नेतृत्वाचा सन्मान! अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा दिमाखदार सत्कार , डॉ. परिक्षीत बाविस्कर व प्रशांत निकम यांचा सहपत्नी गौरव; ज्येष्ठ नेते मा.आ. डॉ. बी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा

Loading

लोकनियुक्त नेतृत्वाचा सन्मान! अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा दिमाखदार सत्कार

डॉ. परिक्षीत बाविस्कर व प्रशांत निकम यांचा सहपत्नी गौरव; ज्येष्ठ नेते मा. आ.  डॉ. बी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर व उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचा सहपत्नी जाहीर सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार मा. आबासाहेब डॉ. बी. एस. पाटील उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या कार्याचा गौरव करत, शहराच्या विकासासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेशदादा पाटील, बन्सीलाल भागवत, प्रविण जैन, मुन्ना शर्मा, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, देखरेख संघाचे माजी चेअरमन प्रताप पाटील, शरद पाटील, अरुण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिनकर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष योजना पाटील, सोनलताई निकम, जाकिर शेख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र मराठे, चंद्रशेखर भावसार, देवेंद्र देशमुख, विलास पवार, मनोहर निकम, माजी केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, कढरे गुरुजी, कृष्णा पाटील, अनिल पाटील जानवे, चिंधू वानखेडे, अनंत निकम, मनोहर पाटील, शांताराम कोळी, वासुदेव पाटील, हरीश लाड यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील सर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भटू पाटील व सुभाष पाटील मारवड यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सत्कार समारंभातून महाविकास आघाडीच्या एकजुटीचे दर्शन घडले असून, अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकनियुक्त नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *