“चोपडा तालुक्यात NSUI चा थेट विद्यार्थी संवाद; आरोग्य, शिक्षण व वसतिगृह समस्यांवर ठोस पावले”
![]()
“चोपडा तालुक्यात NSUI चा थेट विद्यार्थी संवाद; आरोग्य, शिक्षण व वसतिगृह समस्यांवर ठोस पावले”
चोपडा प्रतिनिधी
आज NSUI च्या वतीने जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधण्यात आला. या संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, आरोग्य सुविधा तसेच वसतिगृहांशी संबंधित समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या आरोग्य सुविधांतील कमतरतेची दखल घेत, NSUI च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी दोन डॉक्टर कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना तातडीच्या व दर्जेदार आरोग्य सेवांचा थेट लाभ मिळणार आहे.
याचवेळी चोपडा तालुक्यातील NSUI ची नवीन कार्यकारिणी तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी आठवड्यात होणाऱ्या शाखा शुभारंभाच्या नियोजनाचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील सुविधा, अडचणी व व्यवस्थापनाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी संबंधित वसतिगृह अधीक्षकांशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्यात आला.
या कार्यक्रमाला NSUI प्रदेश महासचिव ॲड. कौस्तुभ पाटील, जयेश सुभाष पाटील, अजिंक्य चिखलोदकर तसेच चोपडा येथील मुकेश पावरा यांची उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्यांच्या मूलभूत प्रश्नांच्या निराकरणासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी NSUI सातत्याने संघर्ष करत राहील, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.प्रदेश महासचिव – NSUI
ॲड. कौस्तुभ पाटील यांनी सांगितले.

