प्रा. रविंद्र माळी यांच्या “Pharmacy, Law and Ethics” पुस्तकाचे भव्य प्रकाशन
1 min read

प्रा. रविंद्र माळी यांच्या “Pharmacy, Law and Ethics” पुस्तकाचे भव्य प्रकाशन

Loading

प्रा. रविंद्र माळी यांच्या “Pharmacy, Law and Ethics” पुस्तकाचे भव्य प्रकाशन

अमळनेर प्रतिनिधी :
श्री स्वामी नारायण संप्रदायाच्या सुवर्णमहोत्सवी शाकोत्सव २०२६ या पवित्र व ऐतिहासिक सोहळ्यात अमळनेरचे सुपुत्र प्रा. रविंद्र माळी यांच्या “Pharmacy, Law and Ethics” या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडले. या प्रसंगी सर्व संतगण व स्थानिक मंत्री श्री. गजेंद्रसिंग जी. परमार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रा. रविंद्र माळी हे श्री स्वामीनारायण विश्व मंगल गुरुकुल व स्वामीनारायण युनिव्हर्सिटी, कलोल (जि. गांधीनगर, गुजरात) संचलित फार्मसी महाविद्यालयात सेवारत असून, फार्मसी शिक्षणात कायदे व नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांसह अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
या गौरवपूर्ण कार्याबद्दल गुरुकुल व युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष स्वामी प्रेमस्वरूपदासजी, संत भक्तवत्सलजी, भक्तीनंदनजी तसेच सर्व गुरुकुलातील संतवृंद, युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रूपेश वसाणी, रजिस्ट्रार डॉ. अजित गंगावणे, विविध शाखांचे डीन, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रा. माळी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
तसेच क्षत्रिय कांच माळी समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पंच मंडळ सदस्य, समाजबांधव, मित्रपरिवार, तसेच अमळनेर फार्मसी महाविद्यालयाचे सहकारी प्राध्यापक व कर्मचारीवर्ग यांनीही त्यांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
प्रा. रविंद्र माळी हे अमळनेर येथील बी-बियाणे व कीटकनाशक औषध विक्रेते श्री. गंगाराम दोधू महाजन यांचे सुपुत्र असून, त्यांच्या या यशामुळे अमळनेरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *