सडावण गावात संविधानाचा लोकजागर या उपक्रमाचे उत्साहात आयोजन!!!
![]()
सडावण गावात संविधानाचा लोकजागर या उपक्रमाचे उत्साहात आयोजन!!!
अमळनेर प्रतिनिधी
नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित, रुख्मिणीताई महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सडावन येथे सुरू असून दि.१० जानेवारी शनिवार रोजी ‘संविधान जागर अभियान अंतर्गत स्री शक्तीचे जागरण त्याचबरोबर संविधान जागरण करून संगितमय नाटक सडावण येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद संचालक प्रा श्री. सुनिल गरुड सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शेख सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. एन.एस.पाटील सर, सुनीता मोरे, अनिता संदानशिव, श्रध्दा रेखा राजेंद्र, भारती कोळी, उषा देवरे, रोहीणी शिरसाठ, मेघा मुंदडा या महिला कलावंतांनी संविधान जागरण अभियान प्रभावीपणे जनतेच्या व विद्यार्थ्यांनच्या मनात रूजविले. महिला व मुली सक्षम रित्या उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी स्री शक्तीचा जागर केला.
अध्यक्ष स्थानाहून प्रा. सुनिल गरुड यांनी संविधानाचा लोक जागर या उपक्रमाचे कौतुक करून भारतीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल तर संविधान हे घराघरात पोहोचले पाहिजे, मनामनात रुजलं पाहिजे. भारतीय संविधान हे या देशाचा आत्मा असून आत्मा शाबूत असेल तर मानवी जीवन जगणं सुककर होईल असे आग्रहाचे प्रतिपादन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. जवळपास ६० विद्यार्थीनी उपस्थित होत्या. त्याचबरोबर सडावण पंचक्रोशीतील अनेक महिला व नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.डॉ.शुभांगी चव्हाण,प्रा.डॉ. किरण पाटील,प्रा.डॉ. सारिका पाटील यांनी प्रयत्न केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ. किरण पाटील यांनी केले.

