अमळनेर शहर विकासाला गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण निवडी  उपनगराध्यक्षपदी प्रशांत मनोहर निकम; स्वीकृत नगरसेवकांच्याही निवडी जाहीर
1 min read

अमळनेर शहर विकासाला गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण निवडी उपनगराध्यक्षपदी प्रशांत मनोहर निकम; स्वीकृत नगरसेवकांच्याही निवडी जाहीर

Loading

अमळनेर शहर विकासाला गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण निवडी

उपनगराध्यक्षपदी प्रशांत मनोहर निकम; स्वीकृत नगरसेवकांच्याही निवडी जाहीर

 

 

 

 

 

 

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगर परिषदेत नुकत्याच पार पडलेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या. या निवडीमुळे अमळनेर नगर परिषदेच्या राजकीय समीकरणांना नवे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी अमळनेर शहर विकास आघाडी तसेच विविध गटांचे नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार शिरीषदादा गटाकडून उपनगराध्यक्षपदी प्रशांत मनोहर निकम यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून१) मोहन सातपुते२) गुलाब पाटील
यांची निवड करण्यात आली.
विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेविका जयश्री पाटील व त्यांच्या गटातील सर्व नगरसेवकांनी अमळनेर शहर विकास आघाडीचे डॉ. डिगंबर महाले यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड केली.
दरम्यान, अपक्ष गटाच्या वतीने नगरसेवक महेश देशमुख व सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील व अपक्ष नगरसेवक यांच्या समर्थनाने प्रताप साळी यांची अपक्ष गटातून स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.
या निवडींच्या अनुषंगाने नगर परिषद सभागृहात निवड झालेल्या सर्व स्वीकृत नगरसेवकांसह नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहराच्या विकासात्मक कामांना गती मिळावी, नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात, तसेच घरपट्टी व पाणपट्टी संदर्भातील निर्णय जनतेच्या हिताचा विचार करून घ्यावेत, अशी अपेक्षा उपस्थित नागरिक व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.
नगर परिषदेमार्फत अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम होईल, अशी आशा यानिमित्ताने नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
सर्व निवड झालेल्या उपनगराध्यक्ष व स्विकृत संचालक यांचे अभिनंदन आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, डॉक्टर बी एस पाटील, हिरा उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ रवींद्र चौधरी, एडवोकेट ललिता पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश पाटील सह मित्रपरिवार यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *