सेवा, समर्पण आणि संघटनशक्तीचा उत्सव,   माजी जि.प. सदस्य संदीप पाटील यांचा वाढदिवस सामाजिक ऐक्याने साजरा
1 min read

सेवा, समर्पण आणि संघटनशक्तीचा उत्सव, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील यांचा वाढदिवस सामाजिक ऐक्याने साजरा

Loading

सेवा, समर्पण आणि संघटनशक्तीचा उत्सव,

माजी जि.प. सदस्य संदीप पाटील यांचा वाढदिवस सामाजिक ऐक्याने साजरा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अमळनेर प्रतिनिधी :
भालेरावनगर, पाटीलगढी, गुरूकृपा कॉलनी, आर.के. नगर परिसरातील नागरिकांचे लाडके नेतृत्व, माजी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब श्री. संदीप प्रभाकर पाटील यांचा 48 वा वाढदिवस गुरुवार, दि. 8 जानेवारी 2026 रोजी अत्यंत उत्साहात व सामाजिक एकोपा जपत साजरा करण्यात आला. सायंकाळी 7 वाजता मुंदडा एक्झोटिका येथे हा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमास परिसरातील पाचही कॉलनीतील बहुसंख्य रहिवासी, ज्येष्ठ, श्रेष्ठ व अनुभवसंपन्न मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर रामचंद्र उपासनी बाबा, सेवानिवृत्त आदर्श केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, श्रीराम पाटील, हरिचंद्र कढरे, गंगाधर अहिरराव, अनिल पाठक, व्ही.ए. पाटील, विलास पाटील, डी.एम. पाटील, कुलकर्णी दादा आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विजय पाटील यांनी केले. यावेळी हरिचंद्र कढरे दादा यांनी राष्ट्रमाता जिजाऊ मातेवर आधारित स्वरचित गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. अभियंता उज्वल पाटील व महेंद्रजी काटे यांनीही सुमधुर गीतगायन केले. गुलाबराव पाटील यांनी अभिष्टचिंतन करत बापूसाहेबांच्या कार्याचा गौरव केला.
विजय पाटील सर यांनी जिल्हा परिषद सदस्य असतांना बापूसाहेबांच्या झपाट्याने काम करण्याच्या पद्धती, लोकाभिमुख स्वभावावर सविस्तर मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष डी.एम. पाटील यांनी त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे तोंडभरून कौतुक करत उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आदिशक्ती तुळजापूर भवानी मातेस उदंड आयुष्य व यशस्वी राजकीय वाटचालीसाठी प्रार्थना करण्यात आली.
अनिल पाठक महाराज यांच्या मंत्रोच्चारात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात परिसरातील नागरिकांमधील एकोपा, टीमवर्क व सामाजिक सलोखा अधोरेखित झाला. केवळ वाढदिवस नव्हे तर सर्व सण-उत्सव, जयंती, पुण्यतिथी, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, भजन, गुणवंतांचा गौरव, क्रीडा व कला स्पर्धा एकत्रितपणे साजऱ्या करण्याची परंपरा या वसाहतीत जोपासली जाते, हे यावेळी प्रकर्षाने दिसून आले.
अध्यक्षीय भाषणात सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांनी बापूसाहेब संदीप पाटील यांना लोकनेते, खान्देशरत्न, वॉटर हिरो अशी उपाधी देत त्यांच्या विनम्र, सेवाभावी, समाजप्रिय व संघटन कौशल्याचा गौरव केला. “एकच ध्यास – जनतेवर विश्वास” या तत्त्वावर काम करणारे बापूसाहेब गोरगरीबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जातात, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी बापूसाहेब संदीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानत सर्वांना अल्पोपहार व चहापान दिले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत आनंदी, प्रेरणादायी व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *