जि. प. प्राथमिक शाळा पळासखेडा (मिराचे) येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
1 min read

जि. प. प्राथमिक शाळा पळासखेडा (मिराचे) येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Loading

जि. प. प्राथमिक शाळा पळासखेडा (मिराचे) येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पळासखेडा (मिराचे), ता. जामनेर, जि. जळगाव येथे जि. प. प्राथमिक शाळा पळासखेडा येथे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी दूतांच्या वतीने थोर समाजसुधारिका व भारतीय महिला शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात कृषी दूत पार्थ भदाणे, महेश पाटील, नवितेजा मेंडे, अमिन मुजावर व अमन मोगल यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याविषयी माहिती देण्यात आली.

महिला शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक समानता व स्त्री सबलीकरण यावर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, प्रेरणा व सकारात्मक विचार निर्माण झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *