अमळनेरमध्ये ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’ उत्साहात संपन्न.,  विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय.
1 min read

अमळनेरमध्ये ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’ उत्साहात संपन्न., विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय.

Loading

अमळनेरमध्ये ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’ उत्साहात संपन्न.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय.

अमळनेर प्रतिनिधी :- पत्रकार दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात भव्य असा ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व अमळनेर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यामुळे पोलीस व पत्रकार यांच्यातील समन्वय, परस्पर विश्वास व सामाजिक बांधिलकीचे प्रभावी दर्शन घडले.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री ॲड. विजय नवल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे होते. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासह राजकीय, प्रशासकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा गौरव.
समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये—

आ. अनिल भाईदास पाटील व ओमप्रकाश मुंदडा – अमळनेर भूषण
ॲड. विजय नवल पाटील व भिकन पाटील – शिक्षण महर्षी.
शिवाजीराव पाटील – साहित्य रत्न
पांडुरंग पाटील – जीवन गौरव (पत्रकारिता)
मंगळग्रह मंदिर देवस्थान – आदर्श देवस्थान
डॉ. जी. एम. पाटील – आरोग्य देवदूत
डॉ. प्रशांत शिंदे – आदर्श आरोग्य सेवादूत
महेश पाटील – आदर्श लोकसेवक
वाहतूक पोलीस विभाग – उत्कृष्ट सेवा
सिद्धांत सिसोदे – आदर्श पोलीस कर्मचारी
अनिता सुरडकर – आदर्श शिक्षिका
कैलास पाटील – उद्योगरत्न
विक्की जाधव – आदर्श उद्योजक
प्रितेश पारख, रोनक संकलेचा, जितेंद्र गुंजाळ, प्रेमकुमार सासनाणी – युवा उद्योजक
किरण (कृष्णा) बहारे – समाज भूषण
ज्ञानेश्वर धनगर – आदर्श समाजसेवक
सौ. रिता बाविस्कर – आदर्श सामाजिक कार्यकर्त्या
प्रवीण पाटील – उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता
डिगांबर वाघ – उत्कृष्ट अभियंता
एकनाथ सोनवणे – आदर्श वृत्तपत्र वितरक
गोविंद गायकवाड – उत्कृष्ट गायक
रविंद्र भोई – उत्कृष्ट कलाकार
अजय शिवरामे – आदर्श कर्मचारी
पारस गोल्ड – आदर्श सुवर्णकार
नितीन पाटील – आदर्श सरपंच

 

 

 

 

 

 

 

 

 

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) शाखा अमळनेरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे उपस्थित मान्यवर, पुरस्कारार्थी, पोलीस प्रशासन व सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *