नाशिकमध्ये साहित्याचा महोत्सव; 23 व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रभाकर जोशी
1 min read

नाशिकमध्ये साहित्याचा महोत्सव; 23 व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रभाकर जोशी

Loading

नाशिकमध्ये साहित्याचा महोत्सव; 23 व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रभाकर जोशी

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
खानदेशातील मराठी साहित्य चळवळीला नवे बळ देणाऱ्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने आयोजित 23 वे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन येत्या 15 मार्च रोजी नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या प्रतिष्ठेच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अमळनेर येथील ज्येष्ठ साहित्यिक, प्रसिद्ध लेखक व संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
अमळनेर शहराच्या साहित्यिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे, तसेच खानदेशातील साहित्य चळवळीचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाणारे प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांची निवड ही संपूर्ण साहित्य विश्वासाठी गौरवास्पद मानली जात आहे. त्यांच्या साहित्यिक अभ्यासपूर्ण लेखनातून संत साहित्याची मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.
या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सावळाराम तिदमे यांची नियुक्ती करण्यात आली असून, संमेलनास राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कवी, समीक्षक व अभ्यासकांची उपस्थिती लाभणार आहे. विचारमंथन, साहित्यिक सत्रे आणि अनुभवसमृद्ध संवाद यामुळे हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
23 व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अमळनेर शहरासह संपूर्ण खानदेशातून सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *