व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे शालेय क्रीडा महोत्सव संपन्न..*
1 min read

व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे शालेय क्रीडा महोत्सव संपन्न..*

Loading

*व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे शालेय क्रीडा महोत्सव संपन्न..*
___________________________
विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात ग्रामीण भागातून खेळात कसे उल्लेखनीय कामगिरी मिळू शकते त्या प्रसंगी शिरुड हायस्कुल येथे तीन दिवसीय क्रीडा महोत्सव आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडास्पर्धांचे उद्घाटना साठी *मा. उपसरपंच नानासो श्री वसंत भगवान पाटील (शालेय समिती सदस्य )* अध्यक्ष स्थान देण्यात आले. तथा प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले *श्री. एस.पी.वाघ सर (क्रीडा तालुका प्रमुख)* यांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांसाठी आपले मनोगत मध्ये खेळाडू कसा घडला पाहिजे, खेळाबद्दल जिद्द, चिकाटी व तसेस गरीब घरातून राष्ट्रीय खेळाडू कसे बनले कल्पना राऊत यांच्या जीवन माहिती सांगितली चीनमधील गुआंगजऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले; पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला.
दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा. पाण्यासाठी वणवण करणे, हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच ! अशी खेळाळू कल्पना राऊत यांचे बद्दल सांगितले असे विविध मुद्यावर स्पर्धेबाबत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. तसेच अध्यक्ष, प्रमुख पाहुणे,शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मशाल पेटून खेळना सुरवात करण्यात आली.
मैदान स्पर्धा, क्रीडा स्पर्धेत खो-खो, क्रिकेट,100 मी.धावणे, लिंबू चमचा शर्यत,गोणपाट शर्यत,स्लो सकलिंग, रिले शर्यत इ. खेळांचा समावेश होता. शाळेतील इ. 5वी ते 10वी च्या वर्गातील विद्यार्थ्यी क्रिडास्पर्धेत उत्स्फुर्तपणे सहभागी झालेत.
सदर क्रिडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक *दादासो श्री.अनिल शिवाजी पाटील* व शिक्षक /शिक्षिका /शिकेतर कर्मचारी उपस्थित होते.
*सूत्रसंचालन :-* *श्री गुलाब बोरसे सर* यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *