उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान जळगावात ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर*
1 min read

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान जळगावात ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर*

Loading

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान जळगावात ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर*

जळगाव, दि. ७ (जिमाका) – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ८ जानेवारी २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जळगाव शहरातील नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेता जळगाव शहरातील कार्यक्रमस्थळ तसेच जळगाव विमानतळ परिसर ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित करण्यात आला आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून हा आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून दुपारी ४.०० वाजेपर्यंत जळगाव विमानतळ व जळगाव शहरातील नियोजित कार्यक्रम परिसरात ड्रोन तसेच तत्सम उडणाऱ्या यंत्रणांच्या वापरावर व प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

हा आदेश भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चा कलम १६३ (१)(३)नुसार एकतर्फी पद्धतीने निर्गमित करण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम २२१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे श्रीमती चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *