परीक्षा पे चर्चा’मुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर ; नागझिरी केंद्रप्रमुख मनोज नाईक यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
‘परीक्षा पे चर्चा’मुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर ; नागझिरी केंद्रप्रमुख मनोज नाईक यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
धुळे प्रतिनिधी
भारत सरकार व शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणारा ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारा आणि त्यांच्या मानसिक आरोग्याला बळ देणारा महत्त्वाचा कार्यक्रम ठरत आहे. परीक्षेच्या काळात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर पालकही तणावाखाली असतात. हा तणाव कमी व्हावा, विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळावा आणि सकारात्मक समुपदेशन घडावे, या उद्देशाने भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
या उपक्रमाच्या अनुषंगाने नागझिरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. मनोज नाईक यांनी आमच्या विद्यालयास भेट देत विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. अभ्यासाचे दडपण, परीक्षेची भीती, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास वाढविण्याबाबत त्यांनी अत्यंत सोप्या व प्रेरणादायी भाषेत मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर होऊन आत्मविश्वास निर्माण झाला.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बन्सीलाल माळी यांनी श्री. मनोज नाईक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी रुजल्याचे समाधानकारक चित्र यावेळी दिसून आले.

