लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे मध्य प्रदेशात भव्य प्रकाशन*
1 min read

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे मध्य प्रदेशात भव्य प्रकाशन*

Loading

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे मध्य प्रदेशात भव्य प्रकाशन*

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ (केंद्रीय नीती आयोग संलग्न) यांच्या वतीने सन २०२६ च्या मध्य प्रदेश आवृत्ती दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र पत्रकार दिनाचे औचित्य साधून इंदौर (म.प्र.) येथे मराठा प्रहार च्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय चंद्रकांत दादा कुंजीर
(संस्थापक अध्यक्ष – क्षत्रिय मराठा नवनिर्माण सेना,
मुख्य संपादक – दै. मराठा प्रहार व मराठा प्रहार न्यूज चॅनल)
हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवी तथा विविध संस्थांचे पदाधिकारी सन्माननीय मिलिंदजी दिघे उपस्थित होते. तसेच सौ. स्वातीताई मोहीते, श्री धनंजय कोलार, श्री ओम नम्र, ललित जैन भंसाली,दिलीप देशमुख, आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मध्य प्रदेश राज्य प्रभारी श्री. उमेश थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची प्रस्तावना मा.दिलीप देशमुख यांनी मांडली. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी ‘दर्पणकार ‘ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करत मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून समाजप्रबोधनाचे महान कार्य त्यांनी केले, असे प्रतिपादन केले. याच औचित्याने मध्य प्रदेश आवृत्ती दिनदर्शिकेचे औपचारिक प्रकाशन करून उपस्थित पत्रकार, पदाधिकारी व मान्यवरांना दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात माननीय चंद्रकांत दादा कुंजीर म्हणाले,
“समाजाचा आरसा म्हणून काम करणारा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. सत्य, निर्भीडता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांच्या आधारावर पत्रकार सतत जनतेचा आवाज बनून उभा राहतो. अन्याय, भ्रष्टाचार आणि असत्याविरुद्ध लेखणी उचलत समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतो.”

यावेळी प्रमुख अतिथी समाजसेवी सन्माननीय मिलिंदजी दिघे यांनी आपल्या भाषणातून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या २०२६ मध्य प्रदेश दिनदर्शिकेस तसेच महासंघाच्या विविध सामाजिक व पत्रकारहिताच्या उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. पत्रकारिता हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून पत्रकारांच्या सन्मान, हक्क व सामाजिक बांधिलकीसाठी महासंघ करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मध्य प्रदेश राज्य प्रभारी श्री. उमेश थोरात यांनी आपल्या मनोगतात महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री. संजय बापू देशमुख निंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महासंघाचे संघटनात्मक कार्य अधिक बळकट होत असून पत्रकारांच्या हक्क, सन्मान व सामाजिक बांधिलकीसाठी महासंघ सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *