अमळनेरमध्ये उद्या ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’; क्रीडा, संस्कृती व सन्मानाचा त्रिवेणी संगम
1 min read

अमळनेरमध्ये उद्या ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’; क्रीडा, संस्कृती व सन्मानाचा त्रिवेणी संगम

Loading

अमळनेरमध्ये उद्या ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’; क्रीडा, संस्कृती व सन्मानाचा त्रिवेणी संगम

अमळनेर (प्रतिनिधी):
पत्रकार दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे उद्या, मंगळवार रोजी सायंकाळी ५:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात एक अभूतपूर्व ‘पोलीस-पत्रकार महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना आणि ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा सोहळा संपन्न होणार असून, यात क्रीडा, संस्कृती आणि पुरस्कारांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळणार आहे.
विविध स्पर्धा आणि कौटुंबिक आनंद
पोलीस प्रशासन आणि पत्रकार बांधव यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी आणि त्यांच्या परिवारातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या महोत्सवात गीतगायन, निबंध आणि नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः गृहिणींसाठी संगीत खुर्ची आणि लिंबू-चमचा यांसारख्या खेळांची मेजवानी असल्याने या सोहळ्याला कौटुंबिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दिग्गज मान्यवरांची मांदियाळी
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री ॲड.विजय नवल पाटील यांच्या हस्ते होणार असून, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंदजी वाकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
प्रमुख अतिथी म्हणून खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत:
मा.गुलाबराव पाटील: पालकमंत्री, जळगाव जिल्हा.
मा.स्मिताताई वाघ: खासदार, जळगाव.
मा.अनिल भाईदास पाटील:माजी मदत व पुनर्वसन मंत्री तथा विद्यमान आमदार.
प्रशासकीय अधिकारी: जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व कविता नेरकर, प्रांत अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी.
राजकीय व सामाजिक नेतृत्व: माजी आमदार शिरीष चौधरी, डॉ. बी. एस. पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांसह पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी.
गुणवंतांचा ‘रत्न’ पुरस्कारांनी सन्मान
या सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यामध्ये ‘अमळनेर भूषण’, ‘शिक्षण महर्षी’, ‘आरोग्य देवदूत’, ‘जीवनगौरव पत्रकारिता’,आदर्श कर्मचारी, आदर्श युवा उद्योजक, आदर्श समाजसेवक,’आदर्श पोलीस कर्मचारी’ आणि ‘आदर्श सरपंच’ यांसह विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण केले जाईल.

खान्देशी कलाकारांचा रंगारंग आविष्कार

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे खानदेशातील नामांकित कलाकारांची उपस्थिती. पुष्पा ठाकूर, संध्या अंभोरे, भैया मोरे, गोविंद गायकवाड, जगदीश व शशांक संदानशिव, अल्ताफ राजा, रवी बॉडीगार्ड, आकाश पवार आणि राज दाभाडे आपल्या गायकीने आणि कलेने रंगत भरतील. तसेच प्रसिद्ध कॉमेडियन विलास कुमार शिरसाट आपल्या विनोदी शैलीने उपस्थितांना खळखळून हसवतील.
आयोजक: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई), शाखा अमळनेर.
या भव्यदिव्य सोहळ्याला अमळनेरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *