मसाप शाखेतर्फे अभिवाचन स्पर्धेचे आयोजन; ६ जानेवारीला नियोजन बैठक
![]()
मसाप शाखेतर्फे अभिवाचन स्पर्धेचे आयोजन; ६ जानेवारीला नियोजन बैठक
अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) शाखेच्या उपक्रमांतर्गत लवकरच अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आहे. या स्पर्धेतील विजेत्या कलाकारांना भविष्यात होणाऱ्या विविध अभिवाचन कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे.
अभिवाचन क्षेत्रात नवोदित व इच्छुक कलाकार घडावेत, तसेच रसिकांची अभिरुची विकसित व्हावी, या उद्देशाने तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली अभिवाचन प्रशिक्षण देण्याचाही विचार करण्यात आला आहे.
या संपूर्ण उपक्रमासंदर्भात सखोल चर्चा व नियोजन करण्यासाठी दिनांक ६ जानेवारी २०२६, मंगळवार रोजी सायंकाळी ६ वाजता साने गुरुजी विद्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मसाप कार्यकारी मंडळाचे सदस्य, सभासद तसेच अभिवाचनात रस असलेले कलाकार व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच अभिवाचनासाठी इच्छुक असलेल्या मित्र, सहकारी व साहित्यप्रेमींनाही या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असे नाटककार संदीप जी घोरपडे व साहित्यिक भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे.

