क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक विचार जिवंत ठेवण्याची गरज – शरद पाटील*
1 min read

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक विचार जिवंत ठेवण्याची गरज – शरद पाटील*

Loading

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक विचार जिवंत ठेवण्याची गरज – शरद पाटील*

अमळनेर प्रतिनिधी– सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी केलेलं काम अतिशय उच्च दर्जाचे असून आजच्या काळात त्यांच्या शैक्षणिक विचारांना जिवंत ठेवण्याची गरज आहे. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते व सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष शरद पाटील यांनी केले. विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व “बालिका दिन” प्रसंगी ते बोलत होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवनपट देखील त्यांनी उपस्थितितांसमोर मांडला. महिलांच्या केशवपणा विरोधातला नाभिकांचा संप, बालहत्या प्रतिबंध गृह, महिला पुनर्विवाह साठी केलेले प्रयत्न, पुण्यातील प्लेग च्या साथीच्या वेळेस केलेले कार्य इ. बाबत सविस्तर माहिती देखील त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य बी.डी पाटील होते. प्रमुख अतिथी सुभेदार मेजर श्रीराम पाटील व सर्व सन्माननीय महिला शिक्षिका होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करून झाली व सर्व महिला शिक्षकांचा शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले.
यावेळी सातवीचा विद्यार्थी गिरीश पाटील व आठवीचा विद्यार्थी भूमीत धनगर यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षिका लता पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून बालिका दिनानिमित्त सुंदर गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगिकारावे, असे मत अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बी.डी पाटील यांनी मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणित शिक्षक शिवाजी पाटील यांनी केले. तर उपशिक्षक भूषण साळुंखे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *