पूज्य साने गुरुजी वाचनालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
![]()
पूज्य साने गुरुजी वाचनालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी
पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे चिटणीस आण्णासाहेब प्रकाश वाघ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
यावेळी साने गुरुजी वाचनालयाचे कर्मचारी मधुकर बाळापुरे व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

