आजची माझी कविता  विषय : सावित्रीबाई फुले  शीर्षक : शिक्षिका सावित्री आई
1 min read

आजची माझी कविता विषय : सावित्रीबाई फुले शीर्षक : शिक्षिका सावित्री आई

Loading

आजची माझी कविता

विषय : सावित्रीबाई फुले

शीर्षक : शिक्षिका सावित्री आई

शाळेत जाऊन आज
शिकते माझी ताई
शिक्षिका झाली सावित्री आई…..
सारी तिचीच पुण्याई

डोळा आज ही
येत माझ्या पाणी
आठवता जोतीबा
सावित्रीबाईकाहाणी

मुल बाळ नाही
म्हणून तिला हिणवल
सासू सासऱ्यांनी
घरा बाहेर काढल

माय ममतेच पुणं
पाषाण हृदयी झालं
असह्य त्रास देवून
जगणं मुश्कील केल

ना हार मानली
ना झुकली सावित्री
हिंम्मत देत होता
जोतीबा महात्मा पती

दाखवून दिल जगाला
रिती परंपरा सार खोट
तर्क बुद्धी मानन
माणुसकी जगभर अफाट

स्त्री शिक्षण झाले
भाग्य त्यांचे उजळले
मानाचे स्थान स्त्रियांना
सावित्री आईनेच दिले

पुरुष स्त्रीला गुलाम
करू आज ही पाहतो
एखादा च महात्मा
बायको मागे उभा राहतो

आईसाहेब तुम्ही
सगळं दुःख सहल
या पंगूस तसंच
लोकांनी छळलं

आज ही एकटं
एकाकी आहे जीवन
शिक्षकी पेशा म्हणजे
वेदनांच च ज्वलंत जीन

शिक्षक विद्यार्थी आता
परीक्षा पुरतच नात
पासिंग झालं की,
शिक्षकांना विसरलच जात

लिहून कविता तुमचं
ऋण थोडस फेडतो
शिक्षकी पेशात दिव्यांगी
सद्कारणी देह जिझवतो

आजचा शिक्षक विना
पगारी क्लास वाला
पोरगी न देई कोणी ही
त्याला कोणी ही त्याला

प्रकाश पाटील सर
एम ए बी एड नेट सेट
यशपंढरी इंग्रजी क्लास संचालक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *