मंगरूळ माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यालयात विनम्र अभिवादन व प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
मंगरूळ माध्यमिक विद्यालयात
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यालयात विनम्र अभिवादन व प्रेरणादायी मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, थोर समाजसुधारिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी रोजी आमच्या विद्यालयात भावपूर्ण वातावरणात विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. बापुसो अशोक पवार सर, अध्यक्ष – युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी आदर्श समाजसेविका श्रीमती दिशा संदानशिव मॅडम यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत शिक्षण, स्वावलंबन व सामाजिक समतेचे महत्त्व प्रभावी शब्दांत सांगितले व विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास आदर्श समाजसेविका श्रीमती योगिता पांडे मॅडम प्रमुख उपस्थित होत्या. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश पाटील यांच्यासह प्रभुदास पाटील, संजय पाटील, राजेंद्र पाटील, भटु पाटील, श्रीमती सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, सीमा पाटील, प्रविण पाटील, मनोज पाटील, सुदर्शन पवार, प्रदीप पाटील, खुशाल पाटील आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, स्त्री शिक्षणाचे महत्त्व व प्रगतीशील विचारांची जाणीव निर्माण झाली. उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

