पुस्तकाबाहेरची शिकवण : साने गुरुजी विद्यालयात ‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमातून ग्रामीण संस्कृतीचा अनुभव
1 min read

पुस्तकाबाहेरची शिकवण : साने गुरुजी विद्यालयात ‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमातून ग्रामीण संस्कृतीचा अनुभव

Loading

पुस्तकाबाहेरची शिकवण : साने गुरुजी विद्यालयात ‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमातून ग्रामीण संस्कृतीचा अनुभव

अमळनेर प्रतिनिधी :
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाच्या स्काऊट विभाग व मराठी भाषामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाड्यावरचा चहा’ हा अभिनव व अनुभवसमृद्ध उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. इयत्ता आठवीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘पाड्यावरचा चहा’ या धड्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत स्काऊटच्या माध्यमातून तंबू उभारणी, निसर्ग निवास, तंबू सजावट अशा विविध कृतींचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. दिनांक ३१ डिसेंबर रोजी आयोजित या उपक्रमात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी तंबू सजवताना आकर्षक रांगोळ्या काढल्या तसेच स्वतः भाकऱ्या बनवून ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला भारत स्काऊटच्या जळगाव जिल्हा संघटक माननीय वैशाली अवथले, संस्थेचे सचिव दादासो संदीप घोरपडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील तसेच विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री. संजीव पाटील यांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भाजी, भाकरी व ठेचा यांचा विशेष आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले.
या यशस्वी उपक्रमासाठी सर्व स्काऊट शिक्षक, मराठी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक मेहनत घेत मार्गदर्शन केले. अनुभवाधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सहकार्य व संस्कृतीप्रती जिव्हाळा निर्माण करणारा हा उपक्रम विशेष ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *