नोबेल तर्फे एनडीए एसपीआय साठी रविवारी विनामूल्य कार्यशाळा
1 min read

नोबेल तर्फे एनडीए एसपीआय साठी रविवारी विनामूल्य कार्यशाळा

Loading

नोबेल तर्फे एनडीए एसपीआय साठी रविवारी विनामूल्य कार्यशाळा

अमळनेर प्रतिनिधी – भारतीय सैन्यदलात दाखल होण्यासाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या पूर्व प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्विसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट साठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. सदर परीक्षा इयत्ता दहावी मध्ये असणारे विद्यार्थी देऊ शकतात .या परीक्षेबाबत विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन नोबेल फाउंडेशन तर्फे रविवारी 4 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नोबेल फाउंडेशनच्या सभागृहात प्रगती शाळेसमोर करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी सर्विसेस प्रीपरेटरी इन्स्टिट्यूट परीक्षेचा अभ्यासक्रम,परीक्षेची तयारी कशी करावी, कोणती पुस्तके वापरावी, प्रवेश प्रक्रिया कशी असते तसेच भारतीय सैन्यदलात प्रवेशासाठी आवश्यक एनडीए प्रवेश परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक संख्येने विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संचालक जयदीप पाटील यांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी 9922004193 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *