भव्य संदल व उर्समधून हिंदू–मुस्लिम एकात्मतेचा जागर छत्रपती संभाजीनगर येथील हजरत पिर मोहंमद शाहनूर मियाँ हमवी रहें. दर्गाह शरिफ येथे भक्तीभावाचे वातावरण
![]()
भव्य संदल व उर्समधून हिंदू–मुस्लिम एकात्मतेचा जागर
छत्रपती संभाजीनगर येथील हजरत पिर मोहंमद शाहनूर मियाँ हमवी रहें. दर्गाह शरिफ येथे भक्तीभावाचे वातावरण
संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील हिंदू–मुस्लिम एकात्मतेचे जिवंत प्रतीक असलेल्या हजरत पिर मोहंमद शाहनूर मियाँ हमवी रहें. दर्गाह शरिफ कॅम्पस येथे हजरत पिर अब्दुल रज्जाकबाबा कुरेशी मियाँ सरकार यांच्या सालाबादप्रमाणे भव्य संदल व उर्स निमित्त चादर अर्पण सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला.
दर्गाह कमिटीचे अध्यक्ष जावेद पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, लोकनेते जनसेवक मा. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या पवित्र प्रसंगी माझलगाव, बीड, परभणी, येवला, नाशिक, मुंबई आदी ठिकाणांहून आलेले मान्यवर, धर्मप्रेमी नागरिक व मुरीद मोठ्या संख्येने सहभागी झाले. यामध्ये मोहंमद हनिफ बाबा कुरेशी, वजीरभाई शेख, डॉ. हनिफभाई पठाण, सैय्यद कलीम हाश्मी, सलीम निजामी, रेहान शेरूभाई मोमीन, जाकीरभाई मोमीन, मुन्नाभाई सैय्यद, मोहम्मद हनिफ बाबा (ठाणे), अहमद खान, मुनीर पटेल, हुसेन मोमीन, इमरानभाई मोमीन, शब्बीरबाबा शेख, मजहरबाबा निजामी, मुनीर अन्सारी, जहीर अन्सारी, आरिफ सौदागर, वाहिद अन्सारी, अशरफ मोमीन, सैय्यद रहीमबाबा, सैय्यद इब्राहिम, मोबीन मुलतानी, सलीम कुरेशी, हाजी समीर कुरेशी, माजेद कुरेशी, अ. कादिर कुरेशी, मुसा खान, समीर खान, समीरभाई सैय्यद, रेहान कलीम हाश्मी सैय्यद, जुबेर कुरेशी, अफसरबाबा सिद्धिकी यांच्यासह अनेक नियोजन कमिटी सदस्य उपस्थित होते.
या उर्स सोहळ्यावेळी उर्स कमिटीचे प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक मा. श्री. नबी पटेल (तिडीकर)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ना. अजितदादा पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर
यांचा मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते पुष्पचादर अर्पण करून विशेष प्रार्थना करण्यात आली.
कार्यक्रमानंतर महाप्रसाद भंडारा (लंगर) अन्नदान करण्यात आले. या प्रसंगी सर्व धर्मीय मुरीद व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकात्मतेचा संदेश अधिक दृढ केला.

