लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या जातवैधतेवर प्रश्नचिन्ह पराभूत उमेदवार जितेंद्र ठाकूर यांची न्यायालयात याचिका
![]()
लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या जातवैधतेवर प्रश्नचिन्ह
पराभूत उमेदवार जितेंद्र ठाकूर यांची न्यायालयात याचिका
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर यांच्या अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) जातवैधता प्रमाणपत्राला थेट न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी ही याचिका १ जानेवारी २०२६ रोजी अमळनेर न्यायालयात दाखल केली आहे.
डॉ. बाविस्कर यांनी सादर केलेले मल्हार कोळी जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला असून, त्यांना नगराध्यक्ष पदावरून पायउतार करण्याची मागणी करण्यात आली आहे. सादर पुराव्यांच्या आधारे अवघ्या चार महिन्यांत पदावरून हटविले जाईल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
पदग्रहणाच्या दिवशीच ही याचिका दाखल झाल्याने नव्या नगराध्यक्षांच्या कारकिर्दीला सुरुवातीलाच कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब शासन व खऱ्या आदिवासी समाजावर अन्याय करणारी असल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे.

