प्रभाग १६ मध्ये नव्या नेतृत्वाचा जल्लोष  महेश देशमुख व सौ. निलीमा विश्वनाथ (रवि) पाटील यांचा जंगी मिरवणुकीत पदभार स्वीकार
1 min read

प्रभाग १६ मध्ये नव्या नेतृत्वाचा जल्लोष महेश देशमुख व सौ. निलीमा विश्वनाथ (रवि) पाटील यांचा जंगी मिरवणुकीत पदभार स्वीकार

Loading

प्रभाग १६ अ व १६ ब मध्ये नव्या नेतृत्वाचा जल्लोष

महेश देशमुख व सौ. निलीमा विश्वनाथ (रवि) पाटील यांचा जंगी मिरवणुकीत पदभार स्वीकार

अमळनेर प्रतिनिधी : (ईश्वर महाजन)

अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १६ अ मधील नवनिर्वाचित नगरसेवक श्री. महेश देशमुख तसेच प्रभाग क्रमांक १६ ब मधील नवनिर्वाचित नगरसेविका सौ. निलीमा विश्वनाथ (रवि) पाटील यांनी काल उत्साहपूर्ण व जल्लोषाच्या वातावरणात अधिकृतपणे पदभार स्वीकारला. या प्रसंगी शहरात भव्य व जंगी मिरवणूक काढण्यात आली होती.

मा.आमदार शिरीषदादा चौधरी गटाला बहुमत मिळाल्यानंतर शिवसेनेचा
नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा जंगी पदग्रहण सोहळा अमळनेर येथे पार पडला.
या मिरवणुकीस व पदग्रहण सोहळ्यात
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व माजी आमदार शिरीषदादा चौधरी, मा. आमदार डॉ. बी. एस. पाटील, नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, हिरा उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ रवींद्र चौधरी , शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चौधरी ,शिवसेनेच्या नेत्या अँड ललिता पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश पाटील,
नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक, विविध पदाधिकारी, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने अमळनेरकर नागरिक उपस्थित होते. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रभाग १६ अ चे नगरसेवक महेश देशमुख यांनी पदभार स्वीकारताना नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार व्यक्त केला. “प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या, स्वच्छता, रस्ते व नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन,” असे त्यांनी सांगितले.
तर प्रभाग १६ ब च्या नगरसेविका सौ. निलीमा विश्वनाथ (रवि) पाटील यांनी पदभार स्वीकारताना प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते व पती श्री. रवि पाटील उपस्थित होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव नगरसेविकेच्या कामाला दिशा देणारा ठरणार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त झाली.
दोन्ही प्रभागांमध्ये नव्या नेतृत्वामुळे विकासाची नवी आशा निर्माण झाली असून, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दोन्ही नगरसेवक एकत्रितपणे काम करतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. प्रभाग १६ अ व १६ ब साठी हा दिवस विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *