डाएट अधिव्याख्याता,जिल्हा नोडल अधिकारी श्री. शैलेश पाटील यांनी दिल्या शाळांना भेटी.
![]()
डाएट अधिव्याख्याता,जिल्हा नोडल अधिकारी श्री. शैलेश पाटील यांनी दिल्या शाळांना भेटी.
अमळनेर प्रतिनिधी- आज रोजी मूल्यवर्धन प्रशिक्षणानंतर अंमळनेर तालुक्यात मंगरूळ जिल्हा परिषद शाळा आणि साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर या शाळांना डाएट अधिव्याख्याता मूल्यवर्धन जिल्हा नोडल अधिकारी श्री .शैलेश पाटील साहेब व गटशिक्षणाधिकारी अमळनेर श्री प्रमोद पाटील साहेब मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक जयेश माळी सर मूल्यवर्धन तालुका समन्वय प्रगती माळी मॅडम यांनी शाळा भेटी देऊन शाळांमधील प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतला यामध्ये मूल्यवर्धन उपक्रम अंतर्गत शाळांमधील वर्ग निहाय वर्ग नियम, स्व जाणीव, वैयक्तिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध, सामाजिक जबाबदाऱ्या याविषयी विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली आणि त्यांनी वर्ग तासिका सुद्धा घेतल्या ह्यात जि. प. शाळा मंगरूळ येथे मुख्याध्यापक श्री अमृतकर सर , श्री गोपाळ सर ,भारती पाटील ,स्वाती पाटील उपस्थित होत्या तसेच साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर या ठिकाणी इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गांना भेटी देऊन माननीय गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील साहेब यांनी वर्गात तासिका घेऊन विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमाचे, मूल्यवर्धनाचे महत्त्व जाणून घेतले आणि त्यांना जीवनात आदर्श व्यक्ती व्हा असा संदेश देखील दिला यावेळी गटशिक्षणाधिकारी साहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्या. संजीव पाटील सर ,सौ.गीतांजली घोरपडे, श्रीमती रेखा वाघ, सौ.सुनिता पाटील, श्री .विजय निकम श्री.धीरज कोठवाल, श्री सोमेश्वर मलखेडे, श्री .बापूराव पाटील (ठाकरे) श्री.महेंद्र रत्नपारखी,श्रीमती अभिलाषा तायडे, श्रीमती स्नेहल लांडगे, श्री दिनेश कारले, शिपाई वैशाली ताई उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी साहेब यांनी शिक्षकांच्या कामाचे आणि संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि संचालक मंडळाचे कौतुक केले.


