शब्दांपेक्षा कृतीतून समाजसेवा; वर्ल्ड पार्लमेंटची ओळख – शिवाजी राजेजाधव
1 min read

शब्दांपेक्षा कृतीतून समाजसेवा; वर्ल्ड पार्लमेंटची ओळख – शिवाजी राजेजाधव

Loading

अनाथांचा नाथ असल्याचे वर्ल्ड पार्लमेंटकडून सिद्ध- मा. श्री. शिवाजी राजेजाधव

श्रीरामपूर : – वर्ल्ड पार्लमेंट हि जागतिक संस्था आपल्या लौकीकाप्रमाणे जागतिक पातळीवर सातत्याने सामाजिक, पर्यावरण व कायदे क्षेत्रात कार्यरत आहेच परंतु शब्दशः आपल्या तत्त्व प्रणाली प्रमाणेच काम करते हे सिध्द झाले, असे प्रतिपादन
मा. श्री. शिवाजी दत्तात्रय राजेजाधव, शिंदखेडराजा, राजेलखुजीराव जाधवराव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेब यांचे माहेरचे वंशज यांनी व्यक्त केले. ते श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या वर्ल्ड पार्लमेंट सन्मान सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून बोलत होते.
वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना वर्ल्ड पार्लमेंट एमिझरी अवॉर्ड २०२५ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच इतरही क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना मा. श्री. शिवाजी राजेजाधव यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार संताजीराजे राजेघोरपडे यांचे वंशज मा. श्री. संजयकुमार राजेघोरपडे उपस्थित होते. त्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वर्ल्ड पार्लमेंटच्या माध्यमातून कार्य करणारे डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र चॅप्टर अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून जेष्ठ कृषीतज्ञ डॉ. दिनकर श्रीधर पतंगे यांनी पर्यावरणाचे महत्व पटवून देताना वर्ल्ड पार्टमेंटच्या सर्वच उपक्रमांचे कौतुक केले. महाराष्ट्र शासनाच्या संपादकीय मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनीही वर्ल्ड पार्लमेंट विषयी असलेल्या चांगल्या अनुभवांना उजाळा दिला. सोलापूर जिल्हा शिक्षक संघटनेचे मा.श्री किसन बबन कांबळे यांनी भारतीय संविधानाविषयी उपस्थितांना विस्तृत ज्ञान दिले. जेष्ठ अर्थतज्ञ मा. श्री. शंकर अंदानी, सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.दत्तात्रय डोंगरे, डॉ. सुभाष देशमुख, विठ्ठलराव सोनवणे, अमोल जाधव, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांच्या संकल्पनेनुसार प्रथा बनल्याप्रमाणे कार्यक्रमाचे उदघाटन उपस्थितांच्या हस्ते भारतीय संस्कृतीत व आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व असलेल्या तुळशीला जलार्पण करून झाले. तसेच पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे अनावरण व वाटप करण्यात आले. त्याचबरोबर श्री साई विठ्ठल अनाथाश्रम गोखलेवाडीतील मुलांना उष्ण कपडे व आर्थिक मदत करण्यात आली. वर्ल्ड पार्लमेंटच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना नेहमी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देत असल्याबद्दल सर्वच उपस्थितांनी डॉ. दत्ता विघावे यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड देऊन सन्मानीत करण्यात आले त्यामध्ये कॅप्टन नरेंद्र कुमार सिद्धू (निवृत्त) – क्रीडा व साहित्य (मेरठ). श्री. उल्हास बाबाराव देशमुख -क्रीडा, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक कार्य, कला व अभिनय (अकोला). डॉ. संतोष दामोदर पेठे-शिक्षण, साहित्य, पर्यावरण व सामाजिक कार्य (अकोला). डॉ. संजय रघुनाथ भराटे -आदर्श प्राध्यापक, शिक्षण व साहित्य(पाथर्डी). डॉ. सुभाष भगवानराव देशमुख -शिक्षण, साहित्य व सामाजिक कार्य (पाथर्डी). डॉ. सुभाष जगन्नाथ देशमुख – अर्थशास्त्र व शिक्षण (पाथर्डी).डॉ. रोहन प्रदीप पाटील – सामाजिक सेवा (करमाळा).श्री. नितेश विश्वनाथ देवघरकर- चित्रकला व पेंटिंग( पोलादपूर, रायगड ). कु. आशा भानुदास पालवे – सामाजिक कार्य, (अहिल्यानगर). प्रा. डॉ. सुधीर नरसिंगदास अग्रवाल -शिक्षण, साहित्य, पत्रकारिता व सामाजिक कार्य- (वर्धा). मिलिंद भारतराव लांडे -शिक्षण, क्रीडा व सामाजिक कार्य (अकोला). संजयकुमार रंगनाथ राजेघोरपडे – शिक्षण, आरोग्य व सामाजिक कार्य (करमाळा, सोलापूर). डॉ. शंकर रामदास अंदानी (सी.ए) -अर्थशास्त्र, शिक्षण, सोशल वर्क (अहिल्यानगर). श्री. राजेंद्र शंकरराव घोडके- सामाजिक कार्य (अहिल्यानगर).सौ. संजीवनी काळे- शिक्षण, साहित्य व समाजकार्य (अमरावती). बहिरू गभाले- शिक्षण, पर्यावरण व सामाजिक कार्य (करमाळा). यांचा समावेश आहे.
तसेच पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पर्यावरण प्रेमींना वर्ल्ड पार्लमेंट एमिझरी अवॉर्ड २०२५ देऊन गौरविण्यात आले ते पुढीलप्रमाणे आहेत – श्री. काळूराम पांडुरंग लांडगे -पर्यावरण क्षेत्( पुणे). डॉ. दिनकर श्रीधर पतंगे -पर्यावरण क्षेत्र (जत, सांगली). वजीर जमादार शेख -पर्यावरण क्षेत्र (पाडळी, पाथर्डी).
डब्ल्यूसीपीएचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी प्रास्तवक संस्थेच्या कार्याचा परिचय व भविष्यातील योजनांची माहिती दिली. तर राजेंद्र घोडके यांनी आभार मानले. संस्थेचे वरिष्ठ सदस्य बाळासाहेब कोठुळे यांनी सर्वांगसुंदर सुत्रसंचलन केले तर प्रसिध्दी प्रमुख वजीरभाई शेख व कोषाध्यक्ष चिंतामन भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *