प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींचे अविष्कार स्पर्धेत घवघवीत यश*
1 min read

प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींचे अविष्कार स्पर्धेत घवघवीत यश*

Loading

*प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींचे अविष्कार स्पर्धेत घवघवीत यश*

अमळनेर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची अभिरुची निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यस्तरीय “आविष्कार “स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर वर्गातील कु.नेतल रमेशकुमार माधवानी,कु.रोशनी राजेंद्र सोनार या विद्यार्थिनींनी त्यांच्या संशोधन विषयाचे द्वितीय फेरीत दिनांक 30 व 31 मार्च रोजी उत्कृष्ट असे पोस्टर व power point सादरीकरण करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले, जानेवारी 2026 मधे परभणी-येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे.माननीय कुलगुरू डॉ.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
प्रस्तुत विद्यार्थिनींनी बॅक्टेरिया पासून मिळवलेल्या बायोफिल्मचा वापर शेतात जैविक खत म्हणून पिकांच्या जलद वाढीसाठी कसा उपयोग करता येतो यावर सूक्षजीवशास्त्राच्या प्रा.हेमलता सूर्यवंशी-भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले तसेच विभागप्रमुख प्रा.शशिकांत जोशी,प्रा.वैशाली महाजन ,प्रा.नेहा महाजन तसेच महाविद्यालयाच्या आविष्कार समितीचे समन्वयक प्रा डॉ.रवी बाळसकर प्रा.डॉ.सुरळकर यांनीही विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रताप महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.हर्षवर्धन डी.जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी खा.शि.मंडळाचे चिटणीस प्रा.पी.पी. पाटील,IQAC समन्वयक डॉ.मुकेश भोळे, डॉ.धिरज वैष्णव ,प्रा.डॉ.विजय तुंटे ,डॉ.अमित पाटील, डॉ.आर सी सरवदे,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.माधव भुसनर,प्रा.विजय साळुंखे,डॉ.तोरवणे प्रा.डॉ.एस डी बागुल, प्रा.डॉ.तुषार रजाळे, प्रा.विवेक बडगुजर, डॉ.रामदास सुरळकर,डॉ.बालाजी कांबळे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक ,खा.शि.मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *