नववर्षाच्या सुरुवातीलाच माणुसकीचा उबदार स्पर्श , शिवरथ प्रतिष्ठान अमळनेरकडून दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटप
![]()
नववर्षाच्या सुरुवातीलाच माणुसकीचा उबदार स्पर्श
शिवरथ प्रतिष्ठान अमळनेरकडून दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटप
अमळनेर प्रतिनिधी :
नवीन वर्षाच्या शुभारंभाला सामाजिक बांधिलकी जपत शिवरथ प्रतिष्ठान अमळनेर यांच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी ब्लँकेट वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. थंडीच्या दिवसात गरजू दिव्यांगांना उब देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम अमळनेर येथील ८५/ब ‘शिवनेरी’ राका पार्क, प्रतापमिल कंपाऊंड येथे पार पडला.
या प्रसंगी प्रा. अशोक पवार सर, प्रा. डॉ. राहुल निकम, श्री. ईश्वर ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच शिवरथ प्रतिष्ठान अमळनेरचे अध्यक्ष शिवश्री डॉ. बापुराव ठाकरे, शिवमती पुनम ठाकरे यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.
नवीन वर्ष केवळ उत्सवापुरते मर्यादित न ठेवता समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत माणुसकी पोहोचवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. शिवरथ प्रतिष्ठानने यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम राबविले असून, हा उपक्रम त्याच सामाजिक जाणिवेचा एक भाग असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या उपक्रमाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक व्यक्त करण्यात येत असून, शिवरथ प्रतिष्ठानच्या कार्याची नागरिकांनी प्रशंसा केली आहे.

