अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाची निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न
1 min read

अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाची निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न

Loading

अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाची निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने १५, १७ व २० वर्षांखालील मुले-मुली फ्री स्टाईल व ग्रीक-रोमन प्रकार तसेच वरिष्ठ ग्रीक-रोमन, महाराष्ट्र केसरी माती व गादी गटासाठीची निवड चाचणी स्पर्धा अमळनेर येथील क्रीडा संकुलाच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेचा शुभारंभ बजरंगबलीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगरसेवक राजूदादा फाफरेकर व संजय भिल्ला पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला, तर आखाडा पूजन नगरसेवक सयाजीराव पाटील, सचिन पाटील व माजी नगरसेवक प्रताप अशोक शिंपी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळूभाऊ पाटील, संजय कौतिक पाटील (माजी नगरसेवक), रावसाहेब पहेलवान, शब्बीर पहेलवान व भरत पवार आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या निवड चाचणीतून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी १५ वर्षांखालील फ्री स्टाईल गटात नमन योगेश मनोरे (41 किलो), हसन शेख सादिक (44), यश अशोक धनगर (48) व तुषार अशोक पाटील (52), १५ वर्षांखालील ग्रीक-रोमन गटात चेतन अमृत पाटील (44), १७ वर्षांखालील महिला गटात प्रज्ञा मगनलाल संदानशीव (53) व जयश्री अरविंद विरकर (57), २० वर्षांखालील ग्रीक-रोमन गटात प्रतीक दीपक पाटील (60) व मुकेश शालिक बाविस्कर (63), २० वर्षांखालील फ्री स्टाईल गटात शैलेश चंद्रकांत माळी (57), राहुल विलास राजपूत (61), पवन मोहन पाटील (65), तरुणकुमार रामेश्वर चिते (70) व भाग्येश सुनील जाधव (74) यांची निवड झाली. महाराष्ट्र केसरी गादी गटात अजय बापू धनगर (57), ईश्वर भिल (61), योगराज चौधरी (65), संदीप सुरेश पाटील (74), हर्ष प्रताप शिंपी व सिद्धेश रविंद्र आहेर (86), निजाम अली सैय्यद (92) तर महाराष्ट्र केसरी माती गटात जयेश राजेंद्र पाटील (57), मयूर दीपक पाटील (61) व शुभम विनायक शिंदे (86) यांची निवड करण्यात आली असून वरिष्ठ ग्रीक-रोमन गटात ऋतिक यशवंत पाटील (55), भावेश दिलीप कोळी (60) व ऋषिकेश विलास पाटील (86) हे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. स्पर्धेचे पंच म्हणून प्रविण पाटील व हसन पहेलवान यांनी काम पाहिले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवन प्रताप शिंपी, योगेंद्र चौधरी, निजाम पहेलवान व भावेश कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *