माळी समाजासाठी शिवसेनेत नवा नेतृत्वाचा अध्याय  शालिग्राम मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड
1 min read

माळी समाजासाठी शिवसेनेत नवा नेतृत्वाचा अध्याय शालिग्राम मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड

Loading

माळी समाजासाठी शिवसेनेत नवा नेतृत्वाचा अध्याय

शालिग्राम मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड

पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेली २५ वर्षे सातत्यपूर्ण कार्यरत असलेले शालिग्राम ओंकार मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.

माळी समाजासाठी केलेल्या दीर्घकालीन कार्याची दखल घेत, शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शिफारशीवरून व शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी मालकर यांच्याकडे सोपविण्यात आली.

ठाणे येथे आज अधिकृत नियुक्तीपत्र देऊन ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी माळी क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नव्या भूमिकेत शालिग्राम मालकर हे उत्तर महाराष्ट्रात माळी समाजात व्यापक जनजागृती करणार असून, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या शिवसेनेत अधिकाधिक समाजबांधवांना जोडण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर देणार आहेत. ही निवड माळी समाजाच्या राजकीय सशक्तीकरणासाठी महत्त्वाची ठरणार असल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *