आय.एम.आर.डी परिसंस्थेचे मांडळ ता. शिरपूर येथे हिवाळी शिबीर
1 min read

आय.एम.आर.डी परिसंस्थेचे मांडळ ता. शिरपूर येथे हिवाळी शिबीर

Loading

आय.एम.आर.डी परिसंस्थेचे मांडळ ता. शिरपूर येथे हिवाळी शिबीर

शिरपूर प्रतिनिधी:
वेदांत माळी
गौरव पाटील

शिरपूर येथील आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विशेष हिवाळी शिबीर दि. 02 जानेवारी ते ०8 जानेवारी 2026 दरम्यान ‘मांडळ’(ता.शिरपूर) येथे आयोजीत होणार आहे. या हिवाळी निवासी शिबीराची ब्रिदवाक्य “शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमिन विकासावर विशेष भर” असे आहे. या निवासी सात दिवसाच्या शिबीरात प्लास्टिक मुक्त अभियान : स्वच्छ पृथ्वी स्वच्छ भविष्य, मतदार जनजागृती, जागो ग्राहक जागो, सायबर सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत, आरोग्य, अन्न सुरक्षा, शिक्षण, सक्षम समाजाची निर्मिती इ. अश्या विविध विषयांवर उपक्रम राबविले जाणार असून विविध क्षेत्रातील वक्त्यांची मनोगत, मार्गदर्शन लाभणार आहे.
या सात दिवसीय हिवाळी शिबीराची सुरुवात 02 जानेवारी 2026 रोजी होणार असून या शिबीरात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. प्रथम दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री . सुशिल भटू सोनवणे (माजी सैनिक) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सौ. वैशाली बी. पाटील संचालिका इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट शिरपूर हे आहेत. तसेच सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. देवेंद्र जयराम पाटील (मा. .जि .प. उपाध्यक्ष ), श्री. यतिष सुनील सोनवणे (मा. पं . सदस्य), श्री. सुनिल भटू सोनवणे (मा. सरपंच), सौ. सिमा विशाल सोनवणे (सरपंच ) , श्री. सुनील श्रावण सोनवणे (उपसरपंच ), श्री. जितेंद्र झुलाल सोनवणे(पो. पाटील) ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, जि. प. मुख्यध्यापक, सो.सा. चेअरमन व गावातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे .
या सात दिवशीय निवासी हिवाळी शिबीराची सांगता 08 जानेवारी 2026 रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून मा. डॉ. अतुल खोसे (रा. से. यो. शिरपूर तालुका समन्वयक) व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सौ. वैशाली बी. पाटील (देवरे) यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे
शिबीरासाठी संचालिका डॉ.वैशाली पाटील, सहसंचालक व एम.सी.ए. विभागप्रमुख डॉ. मनोज बेहरे, आय.क्यु.ए.सी. समन्वयक एम.एम.एस. विभागप्रमुख डॉ.मनोज पटेल, पदवी विभाग प्रमुख डॉ.तुषार पटेल यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. शिबीराचे संयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश शेटीया, प्रा. विजय गर्गे, प्रा.विठ्ठल पाटील, प्रा.दिपाली न्हाळदे, प्रा. विवेक चव्हाण, प्रा. ज्योत्स्ना माळी, प्रा. ज्योती गोराणे, प्रा. हर्षदा चौधरी, प्रा. आयशा पिंजारी, प्रा. वैष्णवी सुर्यवंशी तसेच शिबीरात 30 स्वयंसेवकांचा सहभाग असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *