खानदेश शिक्षण मंडळात परिवर्तनाची निर्णायक लढाई भ्रष्टाचार, मक्तेदारी व अधोगतीविरोधात ‘परिवर्तन पॅनल’ मैदानात  धनशक्ती नव्हे जनशक्तीचा कौल द्या – सुजाण मतदारांना ठाम आवाहन
1 min read

खानदेश शिक्षण मंडळात परिवर्तनाची निर्णायक लढाई भ्रष्टाचार, मक्तेदारी व अधोगतीविरोधात ‘परिवर्तन पॅनल’ मैदानात धनशक्ती नव्हे जनशक्तीचा कौल द्या – सुजाण मतदारांना ठाम आवाहन

Loading

खानदेश शिक्षण मंडळात परिवर्तनाची निर्णायक लढाई
भ्रष्टाचार, मक्तेदारी व अधोगतीविरोधात ‘परिवर्तन पॅनल’ मैदानात

धनशक्ती नव्हे जनशक्तीचा कौल द्या – सुजाण मतदारांना ठाम आवाहन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या २०२५ सालच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थेतील कथित भ्रष्टाचार, मक्तेदारी व ढासळलेल्या शैक्षणिक दर्जाविरोधात ‘परिवर्तन पॅनल’ ठामपणे मैदानात उतरले आहे. विद्यमान कारभारामुळे संस्थेची शैक्षणिक, भौतिक व नैतिक अधोगती झाल्याचा गंभीर आरोप करत, आता “धनशक्ती नव्हे तर जनशक्ती”च्या बळावर परिवर्तन घडवण्याची ही शेवटची संधी असल्याचे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.
२००५ ते २०१० या कालावधीत प्रताप महाविद्यालयात सुमारे ८ हजार विद्यार्थी संख्या असताना, आज ही संख्या ४ हजारांच्या आत घसरली आहे. परिणामी अमळनेरसह परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी शिरपूर व चोपडा येथे स्थलांतर करत असल्याचे वास्तव समोर आले आहे. महाविद्यालय व शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव, स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, प्रताप हायस्कूलसह इतर इमारतींची पडझड, तसेच विद्यार्थिनींसाठी अपुरी सुरक्षा व्यवस्था ही व्यवस्थापनाच्या दुर्लक्षाची ठळक उदाहरणे असल्याचा आरोप परिवर्तन पॅनलकडून करण्यात आला आहे.
प्राध्यापक व कर्मचारी भरती प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचे ‘रेट’, बोगस कर्मचारी भरती, खोट्या शालार्थ आयडी प्रकरणात दलाल फरार व अटकेत जाणे, तसेच पी.बी.ओ. स्कूलच्या रंगरंगोटीसाठी २१ लाख रुपयांचे संशयास्पद टेंडर – या सर्व प्रकरणांमुळे संस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येणाऱ्या निवडणुकीत अमाप पैशांचा वापर होण्याची शक्यता असल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.

परिवर्तन पॅनलचा ठोस वचननामा

परिवर्तन पॅनलने आपला स्पष्ट व विकासाभिमुख वचननामा जाहीर केला असून, संस्थेत पारदर्शक, गुणवत्ताधिष्ठित व जबाबदार कारभार राबवण्याची ग्वाही दिली आहे.
प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी भरती फक्त गुणवत्तेनुसार केली जाईल. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना वारसा म्हणून नव्हे तर संधी म्हणून, पात्रतेनुसार प्राधान्य दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
“कार्य कणभर आणि कार्यक्रम खर्च मणभर” अशी अवस्था संपवून, संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी काटेकोर नियोजन, आर्थिक शिस्त व पारदर्शकता राबवली जाईल. खानदेश शिक्षण मंडळ वाचवण्यासाठी मक्तेदारी संपवणे हाच आमचा ध्यास असून, संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिवर्तन पॅनल कटिबद्ध असल्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. ही परिवर्तनाची शेवटची संधी असून, पुढे निवडणूकच होणार नाही, असा स्पष्ट संदेशही यावेळी देण्यात आला.

प्रेरणा व नेतृत्व

परिवर्तन पॅनलला प्रेरणा – श्री. आबासो डॉ. बी. एस. पाटील यांची असून, पॅनलमध्ये सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व सार्वजनिक जीवनातील अनुभवी, स्वच्छ प्रतिमेचे व विश्वासार्ह नेतृत्व सहभागी आहे.
• अग्रवाल निशांत राजेंद्र (निशु) – माजी नगरसेवक, माजी शिक्षण व क्रीडा सभापती, न.प. अमळनेर
• जैन दिलीप हरकचंद – माजी कार्याध्यक्ष, खानदेश शिक्षण मंडळ (सुदीप मेडिकल्स, अमळनेर)
• जैन प्रविण रामलाल – माजी संचालक, खा. शि. मंडळ; ज्येष्ठ संचालक, अर्बन बँक, अमळनेर
• डॉ. अविनाश रघुराज जोशी – अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ; एम.डी., ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ
• पाटील संतोष बाबुराव – ‘प्रहार’ तालुका अध्यक्ष; अध्यक्ष, भारत जागृत मंच, महाराष्ट्र
• शर्मा प्रसाद रमेशचंद्र – श्री. मुन्ना शर्मा यांचे लहान बंधू
शिट्टीवर फुलीचा ठाम निर्धार
अनितीच्या लक्ष्मीचे उपासक न होता, सुजाण मतदारांनी धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा कौल देत खानदेश शिक्षण मंडळात निश्चितपणे परिवर्तन घडवावे, असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *