जिनीयस क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे अबॅकस परिक्षेत यश*
1 min read

जिनीयस क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे अबॅकस परिक्षेत यश*

Loading

*जिनीयस क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे अबॅकस परिक्षेत यश*

अमळनेर प्रतिनिधी
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या आयसीएमएएस अबॅकस चॅम्पियन्सशिप परिक्षेत येथील केशव नगर भागातील सौ.दिप्ती जोशी संचलित जिनीयस क्लासेसच्या सहा विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. या परिक्षेत अमळनेर येथील कु.राधिका नंदकिशोर कुलकर्णी,कु.आरोही पियुष गुजराथी,वेदांत मुरलीधर चौधरी,श्लोक श्रीधर जोशी,
कैवल्य राधाकृष्ण चौधरी, ॠषीकेश श्रीधर जोशी या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सौ.जोशी या ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पध्दतीने अबॅकस क्लासेस घेतात.या यशाबद्दल संचालिका सौ.दिप्ती जोशी व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *