आर. सी. पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
1 min read

आर. सी. पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Loading

आर. सी. पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

शिरपूर प्रतिनिधी:
वेदांत माळी
गौरव पाटील
शिरपूर येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट (आय.एम.आर.डी.) परिसंस्थेत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या समारंभासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील नामांकित कंपनी दिसान टेक्स फॅब, शिरपूरचे संचालक मा. श्री. नीरज अग्रवाल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नृत्यदेवता नटराजाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
यावेळी परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, परिसंस्थेचे उपसंचालक डॉ. मनोज बेहेरे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. मनोज पटेल, पदवी विभाग प्रमुख डॉ. तुषार पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या समारंभात शैक्षणिक, क्रीडा तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२४–२०२५ मध्ये पदवी विभागातील १० व पदव्युत्तर विभागातील ६ अशा एकूण १६ शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कॅरम, हँडबॉल, खो-खो, फेन्सिंग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बुद्धिबळ आदी खेळांमध्ये राष्ट्रीय, राज्यस्तरीय, आंतरमहाविद्यालयीन व विभागीय पातळीवर सहभाग नोंदवलेल्या ११ विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
आय.एम.आर.डी.च्या १६ विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
बी.सी.ए. अंतीम वर्षामधुन परीसंस्थेतील पाटील संजना मनोहर हिने ९.९० सी.जी.पी.ए सह ओ ग्रेड मिळवुन विदयापीठात द्वितीय क्रमांक तसेच अहिरे वैभव राकेश याने ९.८६ सी.जी.पी.ए (९०.०९%) सह ओ ग्रेड मिळवुन विदयापीठात तृतीय क्रमांक तसेच पाटील कामिनी छोटू हिने ९. ८६ सी.जी.पी.ए (८९.५९%) सह ओ ग्रेड मिळवुन विदयापीठात चतुर्थ क्रमांक व पटेल ख़ुशी सतीश हिने ९.८६ सी.जी.पी.ए (८९.२८%) सह ओ ग्रेड मिळवुन विदयापीठात पाचवा क्रमांक मिळवत परिसंस्थेचे नाव उज्वल केले.
बी.बी.ए. अंतीम वर्षामधुन परीसंस्थेतील वर्मा सोनिया मनोज हिने ९ .६५ सी.जी.पी.ए सह ओ ग्रेड मिळवुन विदयापीठात प्रथम क्रमांक तसेच राठोड नक्षत्रा नितीन हिने ९.५१ सी.जी.पी.ए सह ओ ग्रेड मिळवुन विदयापीठात द्वितीय क्रमांक तसेच पाटील अश्विनी कन्हैया हिने ९. ४६ सी.जी.पी.ए सह ए+ ग्रेड मिळवुन विदयापीठात तृतीय क्रमांक मिळवत परिसंस्थेचे नाव उज्वल केले.
बी.एम.एस अंतीम वर्षामधुन परीसंस्थेतील पवार रोशनी सुनील हिने ९.४१ सी.जी.पी.ए सह ए+ ग्रेड मिळवुन विदयापीठात प्रथम क्रमांक तसेच राजपूत दर्शना मुलसिंग याने ९.३६ सी.जी.पी.ए सह ए+ ग्रेड मिळवुन विदयापीठात द्वितीय क्रमांक तसेच जैन अभिषेक योगेश याने ९.३४ सी.जी.पी.ए सह ए+ ग्रेड मिळवुन विदयापीठात तृतीय क्रमांक मिळवत परिसंस्थेचे नाव उज्वल केले.
एम.सी.ए. अंतीम वर्षामधुन परीसंस्थेतील माळी तेजस्विनी रवींद्र हिने ९.७५ सी.जी.पी.ए. (८४.७१%) मिळवून परिसंस्थेत तृतीय क्रमांक पटकावला, बारी कुमुद ईश्वर हिने ९.८१ सी.जी.पी.ए., ओ. ग्रेड मिळवुन विदयापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय तसेच बऱ्हाटे राहुल एकनाथ याने ९.७५ सी.जी.पी.ए. (८५.५४%) ओ. ग्रेड मिळवुन विदयापीठ गुणवत्ता यादीत तृतीय स्थान मिळविले.
एम.सी.ए. (इंटीग्रेटेड) अंतीम वर्षामधुन परीसंस्थेतील पाटील विशाल श्रीराम यांनी ९.६५ सी.जी.पी.ए. मिळवून परिसंस्थेत तृतीय स्थान मिळविले, धोबी राजश्री दीपक हीने ९.७९सी.जी.पी.ए. (८९.२४%) ओ. ग्रेड मिळवुन विदयापीठ गुणवत्ता यादीत प्रथम तसेच महाजन वेंदांत जितेंद्र याने ९.७९सी.जी.पी.ए. (८७.७३%) ओ. ग्रेड मिळवुन विदयापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय स्थान मिळविले.
विशेष उल्लेखनीय यशामध्ये, एम.सी.ए.च्या कु. वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील हिने इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटर, हैदराबाद येथे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (ग्रुप ‘अ’, राजपत्रित) पदावर निवड होऊन संस्थेचा नावलौकिक वाढविला. तिला स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सांस्कृतिक क्षेत्रात, एम.सी.ए. (इंटीग्रेटेड) मधील कु. सई परेश उपकारे हिने के.बी.सी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित युवरंग स्पर्धेत शास्त्रीय नृत्य (भरतनाट्यम) प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. तिला प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
क्रीडा क्षेत्रात, निखिल माळी (फुटबॉल), कु. उन्नती माळी (कॅरम), कार्तिक मुक्ताळकर (हँडबॉल), गौरव राजपूत (खो-खो), कु. चैताली पाटील (व्हॉलीबॉल), कु. हर्षदा पाटील (कबड्डी), कु. कल्याणी माळी (बॅडमिंटन), कु. कल्याणी गिरासे (फेन्सिंग), कु. सई उपकारे (बास्केटबॉल), कु. श्रुती पटकारी (बुद्धिबळ), कल्पेश माळी (बॅडमिंटन) यांनी परीसंस्थेचे नाव उज्वल केले. विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
बी.सी.ए. अंतिम वर्षातील पियुष भोई याने पुणे येथील AISSMS IoT कॅम्पस येथे आयोजित ‘टेलनेट’ स्पर्धेत रोबो रेसमध्ये द्वितीय क्रमांक व रोबो सॉकरमध्ये टॉप ४ मध्ये स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. पियुष भोईच्या या उत्कृष्ट यशाबद्दल त्याचा देखील स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी मा. श्री. नीरज अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करून सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. दिनेश बोरसे व प्रा. अर्चना जडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *