अमळनेर नगरपालिकेत नव्या युगाची पहाट  ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर भव्य कृतज्ञता व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन  जनतेच्या कौलातून अमळनेरच्या विकासाला नवी दिशा
1 min read

अमळनेर नगरपालिकेत नव्या युगाची पहाट ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर भव्य कृतज्ञता व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन जनतेच्या कौलातून अमळनेरच्या विकासाला नवी दिशा

Loading

अमळनेर नगरपालिकेत नव्या युगाची पहाट

ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर भव्य कृतज्ञता व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन

जनतेच्या कौलातून अमळनेरच्या विकासाला नवी दिशा

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन
अमळनेर नगरपालिकेच्या इतिहासात आज एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला असून, हा विजय केवळ एका राजकीय पक्षाचा नसून सामान्य जनतेच्या अतूट विश्वासाचा, प्रामाणिक सेवेचा आणि सर्वसमावेशक विकासाच्या दूरदृष्टीचा विजय आहे. जनतेने दिलेल्या या ऐतिहासिक कौलामुळे अमळनेरच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब व पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत, “राजकारण नव्हे तर समाजकारण” हा मंत्र जपणारे मा. आमदार श्री. शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वावर जनतेने ठाम शिक्कामोर्तब केले आहे. संकटांवर मात करत शब्दांपेक्षा कृतीला प्राधान्य देणारे, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखाशी नाळ जोडणारे आणि विकासाचा स्पष्ट आराखडा मांडणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे. या विजयात रणनीती व पारदर्शकतेचे प्रतीक असलेले बंधू डॉ. रविबापू चौधरी तसेच जनहितासाठी सातत्याने कार्यरत सौ. अॅड. ललिताताई पाटील यांची मोलाची साथ लाभली.
या ऐतिहासिक जनादेशाचा सन्मान राखत, अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासाची धुरा आता मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या सक्षम हातात सोपविण्यात आली आहे. शहराच्या प्रगतीचा, स्थैर्याचा आणि गतिमान प्रशासनाचा नवा अध्याय सुरू होत असून, त्या निमित्ताने कृतज्ञता व पदग्रहण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. डॉ. परीक्षित बाविस्कर तसेच सर्व विजयी शिवसेना व सन्मानीय सहयोगी नगरसेवक १ जानेवारी २०२६ रोजी आपला पदभार स्वीकारणार असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व अमळनेरकरांना जाहीर निमंत्रण देण्यात आले आहे. भव्य मिरवणूक दुपारी ४ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अमळनेर येथून निघून अमळनेर नगरपालिकेत पदग्रहण सोहळ्याने सांगता होणार आहे.
“व्यक्तीपेक्षा विचार मोठा आणि विचारांपेक्षा जनशक्ती मोठी” या विचाराला अनुसरून, नागरिकांची उपस्थिती ही केवळ हजेरी नसून नव्या नेतृत्वाला दिलेला आशीर्वाद व प्रशासनाला दिलेली ऊर्जा असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. शहरातील प्रत्येक जागृत मतदार, अहोरात्र परिश्रम करणारे शिवसैनिक आणि विकासाची आस असणारा प्रत्येक नागरिक यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
जनतेचा विश्वास हाच विकासाचा पाया असून, अमळनेरच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा सोहळा मैलाचा दगड ठरणार आहे.
जय महाराष्ट्र! जय शिवसेना!! जय अमळनेर!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *