ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने खंडाळा ज्युनिअर कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण सभारंभ उत्साहात.
1 min read

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने खंडाळा ज्युनिअर कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण सभारंभ उत्साहात.

Loading

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने खंडाळा ज्युनिअर कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण सभारंभ उत्साहात.

रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने ग्राहक पंचायत समिती महाराष्ट्र च्या वतीने खंडाळा येथील श्रीमती पार्वती शंकर बापट ज्युनिअर कॉलेज मध्ये पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. ग्राहक पंचायत समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम आलेल्या तन्वी दिपक सावंत (11 वी सायन्स) द्वितीय पुर्वा प्रकाश बारगुडे (11 वी विज्ञान ) व तृतीय आलेल्या तनुजा लक्ष्मण पातये (11 वी विज्ञान ) या विद्यार्थीनीना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देवून गौरव करण्यात आला. तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री शिवाजी जगताप यांचाही शाळेच्या उत्तम सहभागाबद्दल सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम स्वामी विवेकानंद व ग्राहकतीर्थ मा. बिंधुमाधव जोशी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष संदेश सावंत यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या वतीनने जिल्हाभर विविध कार्यक्रम घेतल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही क्षेत्रात जर कोणावर अन्याय झाला, लुबाडणुक झाली किंवा फसगत झाली तर संबंधिताने रितसर तक्रार करावी, दाद मागावी. ग्राहकाने आमच्याशी संपर्क साधला तर निश्चितपणे न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक पंचायत वचनबद्ध आहे. सर्वानी सजग व जागृत राहण्याची खुप गरज आहे. ग्राहक पंचायतीकडे आतापर्यंत तक्रार दाखल केलेल्या व्यक्तीना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. असेही श्री सावंत म्हणाले.विद्यार्थी हा देशाचा कणा आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोरच सतत जागृत असले पाहिजे, चौकस असले पाहिजे.अन्याय करणा-या पेक्षा, अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो. अन्यायाविरूद्ध योग्य त्या ठिकाणी दाद मागायला हवी.स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी विवेकानंद यांच्या सकारात्मक उर्जात्मक विचारांची आजही देशाला नितांत गरज आहे असे दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेचे मुख्याधापक विलासराव कोळेकर यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे सचीव आशिष भालेकर, जिल्हा कोषाध्यक्ष दिपक साळवी, पत्रकार उदय महाकाळ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन श्री जंगम सर यांनी केले. यावेळी श्री सरगर सर, श्री मुसळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *