पक्षी मित्र अश्विन पाटील यांना पक्षीविषय जनजागृती पुरस्कार
![]()
पक्षी मित्र अश्विन पाटील यांना पक्षीविषय जनजागृती पुरस्कार
अमळनेर प्रतिनिधी
पक्षी मित्र अश्विन पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षी संवर्धन व पर्यावरण जनजागृतीसाठी सातत्याने कार्य केले आहे. विविध ठिकाणी त्यांनी पक्षीविषयक व्याख्याने देऊन सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पक्षीविषय जनजागृती पुरस्कार – 2025 प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार रावेर मतदारसंघाचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यापूर्वीही अश्विन पाटील यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.

