हृदयनाथ मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्काराने सन्मानित
![]()
हृदयनाथ मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्काराने सन्मानित
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते हृदयनाथ मोरे यांना भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार – २०२५ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
फुले–शाहू–आंबेडकरांच्या बहुजन विचारधारेचा प्रचार, प्रसार व सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या निवडक सामाजिक कार्यकर्त्यांना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. जळगाव जिल्ह्यातून हृदयनाथ मोरे यांची या पुरस्कारासाठी निवड होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
समाजातील उपेक्षित व वंचित घटकांच्या हक्कांसाठी केलेले कार्य, सामाजिक जागृती, वैचारिक प्रबोधन व संघटनात्मक उपक्रमांमुळे मोरे यांचे कार्य सर्वदूर परिचित आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून हृदयनाथ मोरे यांच्यावर समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
.

