श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत शालेय क्रीडा स्पर्धांची धमाल —-!
![]()
श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत शालेय क्रीडा स्पर्धांची धमाल —-!
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत तीन दिवसीय शालेय क्रीडा स्पर्धा मूल्य संवर्धन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या होत्या. सदर क्रीडा स्पर्धा मानवी हक्क दिवस आणि मातृहृदयी पूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्ताने घेण्यात आल्या. उद्घाटक म्हणून मिहीर ( शाहू ) बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते सदर स्पर्धांचे उद्घाटन करून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले. मिहिरच्या आई श्रीमती मंगला बाळासाहेब देशमुख या श्री क्षेत्र पिंगळवाडे तालुका अमळनेर येथे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यांचे पती स्वर्गीय श्री बाळासाहेब अमृत देशमुख हे श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे कोरोना काळात दुःखद निधन झाले होते. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील आवडीनुसार आणि त्यांच्या स्मरणार्थ मुलगा त्यांचा मुलगा मिहीर बाळासाहेब देशमुख आणि पत्नी श्रीमती मंगला बाळासाहेब देशमुख यांनी सदर शालेय विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी रोख रकमेचे बक्षीस सदर प्रसंगी देण्यात आले.
सदर तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेत जोडीने फुगा बॅलन्स शर्यत,बॉल ट्रान्सपर , ग्लास बॅलन्स, बॉल बॅलन्स, बॉटल शर्यत, पिकअप द बॉटल, प्लेस द बॉटल, बाटलीने चेंडू टोलवणे, गणितीय खेळ, गोणपाट शर्यत, चिमटा कलेक्ट शर्यत, कफ बॅलन्स, उलट चालून संगीत खुर्ची, ग्लास बॅलन्सिंग, बलून बॅलन्स, कार्ब रेस अशा विविध आगळ्या आणि वेगळ्या मूल्यवर्धन उपक्रमा अंतर्गत स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
सदर स्पर्धांचे बक्षीस मातृहृदयी पूज्य साने गुरुजी यांच्या जयंती निमित्ताने मुख्याध्यापक संदीप पवार सर यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. सदर बक्षीस वाटपात शालेय शैक्षणिक साहित्याची किट जवळ जवळ 240 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचीही आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यांनाही उपक्रमशील शिक्षक श्री डी. ए. सोनवणे सर यांच्याकडून वस्तूरूपाने बक्षीस देण्यात आले. तसेच चतुर्थ कर्मचारी राहुल पाटील यांनी सदर स्पर्धेसाठी अथक परिश्रम केल्यामुळे रोख रक्कम भेट म्हणून देण्यात आली.
सदर शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी क्रीडा समिती प्रमुख श्री ए. पी .जाधव सर यांनी संपूर्ण जबाबदारी सांभाळली. सदर शालेय क्रीडा स्पर्धेसाठी शिक्षक श्री व्ही. डी. पाटील, श्री डी. एस. माळी,श्री वाय. जे. पाटील, आणि शिक्षिका सौ. बी.एस. चव्हाण,सौ. सी. एस. पाटील, सौ. व्ही.बी.पाटील, श्रीमती एस.एस. ते, श्रीमती ए .यु.महाजन यांनी पर्यवेक्षक म्हणून मोलाची जबाबदारी सांभाळली. आणि श्री पी.एम .ठाकरे यांनी सर्व शालेय प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्गवार नावानिशी लेखी संकलन केले. ठाणे संपूर्ण दिवसाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी. ए. सोनवणे सर यांनी पार पाडले.
सदर शालेय स्पर्धांच्या आयोजनामुळे संस्थाध्यक्ष श्री प्रकाश भाऊ मुंदडा यांनी सर्व शालेय विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना भरभरून शुभेच्छा देऊन सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आणि सदर शालेय क्रीडा स्पर्धा या सर्व विद्यार्थ्यांना मूल्य संवर्धन शिक्षणातून शालेय शैक्षणिक प्रगती अधिक बळकट करण्यासाठी प्रेरणा मिळेल ही अपेक्षा व्यक्त केली.

