ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ शेणपडू बडगुजर यांचे दुःखद निधन  , त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार दि. 27/12/2025 रोजी दुपारी 2.00 वाजता अमळनेर येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार
1 min read

ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ शेणपडू बडगुजर यांचे दुःखद निधन , त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार दि. 27/12/2025 रोजी दुपारी 2.00 वाजता अमळनेर येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार

Loading

ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ शेणपडू बडगुजर यांचे दुःखद निधन

त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार दि. 27/12/2025 रोजी दुपारी 2.00 वाजता अमळनेर येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार

अमळनेर प्रतिनिधी
पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षे निष्ठेने व सामाजिक बांधिलकीतून कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार, ‘अटकाव न्यूज’चे माजी संपादक श्री. जगन्नाथ शेणपडू बडगुजर यांचे अल्पशा आजाराने आज शनिवार दि. 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 5 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने अमळनेर परिसरातील पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
अत्यंत मितभाषी, अभ्यासू व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. पत्रकारितेकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता त्यांनी ती समाजसेवेचे प्रभावी माध्यम मानले. अनेक वर्षे त्यांनी ‘अटकाव’ पेपर चालवून त्यामधून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना, विविध समाजघटकांच्या समस्या व अन्यायाला वाचा फोडली. सत्य, निर्भीडपणा आणि सामाजिक न्याय ही त्यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये होती.
सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत असताना पुढील पिढीलाही पत्रकारितेचे संस्कार मिळावेत या उद्देशाने त्यांनी पत्रकारितेची धुरा मुलगा हितेशकडे सोपवली. त्यामुळे ‘अटकाव’च्या माध्यमातून सुरू असलेली समाजाभिमुख पत्रकारिता पुढेही कायम राहिली.
त्यांची प्रेतयात्रा आज दि. 27/12/2025 रोजी दुपारी 2.00 वाजता अमळनेर येथील त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व असंख्य वाचक असा मोठा परिवार आहे.
शोकाकुल :महेंद्र जगन्नाथ बडगुजर,जितेंद्र जगन्नाथ बडगुजर,हितेश (मुकेश) जगन्नाथ बडगुजर,योगेश रघुनाथ बडगुजर आहेत.
ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ शेणपडू बडगुजर यांच्या निधनाने एक निर्भीड, समाजनिष्ठ पत्रकार हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याची आठवण पत्रकारिता क्षेत्रात कायम स्मरणात राहील.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय सचिव डॉ डिगंबर महाले,
तालुका अध्यक्ष उमेश काटे व सर्व व्हाईस आँफ मीडियाचे पदाधिकारी व सदस्य यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *