टोळी येथे नरेगा ऐवजी “व्ही,बी- जी. राम. जी” जन जागृती बाबत विशेष ग्रामसभा
![]()
टोळी येथे नरेगा ऐवजी “व्ही,बी- जी. राम. जी” जन जागृती बाबत विशेष ग्रामसभा
पारोळा (प्रतिनिधी)-: भारत सरकारने सन दोन हजार पाचमध्ये नरेगा कायद्या सुरु केलेला होता त्यानुसार देशातील ग्रामीण भागातील मजुरांना कामांनुसार वेतन दिले जात होते, नरेगा कायद्यात बदल करून डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने नविन “व्ही. बी- जी. राम, जी.” अधिनियमानुसार देशात योजनेचे नाव बदल केलेले आहे आणि कामांच्या कार्यपद्धतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसुन येत आहे, त्यानुसार योजनेची राज्यात पारदर्शकपणे अमंलबजावणी व्हावी यासाठी टोळी ग्रामपंचायत कार्यालय येथे सव्विस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी “विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) अर्थात व्ही, बी – जी राम जी अधिनियम अंतर्गत जनजागृती करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्या पत्रानुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते, त्यानुसार विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी टोळी येथील सरपंच बापुराव पाटील सर होते, या विशेष ग्रामसभेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील पात्र अनुसुचित जाती, जमाती, दुर्बल भागातील कुटुंब आणि दारिद्रये रेषेखालील कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन विकास व्हावा, यासाठी केंद्र सरकार मार्फत महत्वपूर्ण कायद्या आहे. यानुसार ग्रा. रो. सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी नविन कायद्याची बदलत्या स्वरुपात अमंलबजावणी विषयी थोडक्यात जॉबकार्ड धारक मजुरांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. या विशेष ग्रामसभेला ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रा. पं. सदस्य, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामरोजगार सहाय्यक, शिपाई, संगणक चालक आणि गावातील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

