ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ
जळगांव प्रतिनिधी
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी क्रीडा सप्ताहाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आदरणीय श्री. पालवे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रीडाभावनेला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. एस. एच. बाविस्कर सर होते. त्यांच्या हस्ते नारळ फोडून क्रीडा सप्ताहाचा औपचारिक श्रीगणेशा करण्यात आला. क्रीडा सप्ताहांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये लिंबू-चमचा, १०० मीटर धावणे, स्लो सायकल, लंगडी, लगोरी, तीन पायांची शर्यत, कबड्डी व खो-खो अशा रंजक व कौशल्यपूर्ण स्पर्धांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
या क्रीडा सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. आर. एन. तडवी, श्री. पी. आर. राणे, श्री. बी. डी. झोपे, किशोर भोई, निराशा सोनवणे, सुचिता बाविस्कर, मंगल लोंडते व हेमलता भोळे या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
क्रीडा सप्ताहामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळभावना, संघभावना व शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित होत असून संपूर्ण शाळा परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

