नवनिर्वाचित व विद्यमान नगरसेवकांचा शिवसेना कार्यालयात सत्कार
![]()
नवनिर्वाचित व विद्यमान नगरसेवकांचा शिवसेना कार्यालयात सत्कार
अमळनेर प्रतिनिधी
आज अमळनेर येथे नवनिर्वाचित नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच विद्यमान नगरसेवक दादासाहेब पवार, माजी नगरसेवक मुन्नाभाऊ शर्मा आणि विद्यमान नगरसेविका कल्पना शर्मा यांचे पती यांचा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, अमळनेर येथे जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार तालुकाप्रमुख श्री. सुरेशभाऊ पाटील यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी पुणे येथून आलेले शिवसेना कार्यकर्ते अनिल पाटील, जिजा पाटील, विनोद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
तालुक्यात शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी तालुका अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न व सक्रिय पुढाकार घेतला जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

