प्रताप’मध्ये स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञान कार्यशाळा — विद्यार्थ्यांसाठी सरळ सेवा भरतीची सुवर्णसंधी
![]()
‘प्रताप’मध्ये स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञान कार्यशाळा — विद्यार्थ्यांसाठी सरळ सेवा भरतीची सुवर्णसंधी
अमळनेर प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील करिअर कौन्सिलिंग सेंटर, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (RUSA), अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC) आणि इग्नाईट अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सरळ सेवा भरती सामान्य ज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दि. २६ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत सीसीएमसी सभागृहात संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ व समारोप कार्यक्रम पूज्य साने गुरुजी सभागृहात होणार असून, दररोजची मार्गदर्शनपर व्याख्याने सीसीएमसी हॉल येथे आयोजित करण्यात आली आहेत. उद्घाटनप्रसंगी गुलशन बेलदार (संचालक, इग्नाईट अकॅडमी, पुणे) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, समारोप डॉ. संतोष वटमवार (गणित विषयाचे अभ्यासक, पुणे) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेमध्ये स्पर्धा परीक्षेतील सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सरळ सेवा भरतीचे स्वरूप, तयारीची योग्य दिशा व अभ्यासपद्धती यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी श्री. विजय सिंग पवार, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. विवेक बडगुजर, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, अँड. चंद्रभान पाटील, डॉ. बालाजी कांबळे, क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील, प्रा. विजय साळुंखे, डॉ. किरण गावित, प्रा. सचिन आवटे हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या करिअर घडणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, डॉ. विजय तुंटे, डॉ. मुकेश भोळे व प्रा. विजय साळुंखे यांनी केले आहे.

