अमळनेर नगरपरिषदेत मा.आमदार शिरीष चौधरींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थिर; समर्थकांचा ‘२२’ चा आकडा – दोन गटांची अधिकृत नोंद
1 min read

अमळनेर नगरपरिषदेत मा.आमदार शिरीष चौधरींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थिर; समर्थकांचा ‘२२’ चा आकडा – दोन गटांची अधिकृत नोंद

Loading

अमळनेर नगरपरिषदेत मा.आमदार  शिरीष चौधरींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थिर; समर्थकांचा ‘२२’ चा आकडा – दोन गटांची अधिकृत नोंद


अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगरपरिषदेत राजकीय घडामोडींना निर्णायक वळण मिळाले असून नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी आपल्या समर्थकांचा आकडा तब्बल २२ वर नेला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेत दोन स्वतंत्र गटांची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली असून, त्यामुळे नगरपरिषदेत पूर्ण बहुमत स्पष्ट झाले आहे.

पहिल्या गटाच्या गटनेतेपदी पंकज चौधरी, उपगटनेते म्हणून साहेबराव पवार तर प्रतोदपदी नावेद शेख यांची निवड करण्यात आली आहे. या गटात नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्यासह शिंदेसेनेचे नगरसेवक नावेद शेख, श्रीराम चौधरी, अपूर्वा चौधरी, कल्पना शर्मा, पंकज चौधरी, पुष्पा भोई, सुयोग धनगर, अनिल महाजन, साहेबराव पवार, इर्शाद तडवी यांचा समावेश आहे. तसेच शिरीष दादा मित्रपरिवार आघाडीचे सविता संदानशिव, दीपक चौगुले, अपक्ष कैलास पाटील, सुवर्णा हटकर, रूपाली शिवदे, तसेच **राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)**चे प्रशांत निकम यांनीही या गटात सहभाग नोंदवला आहे.

दरम्यान, दुसऱ्या गटात कल्पना भरतसिंग परदेशी, छाया बाळू पाटील, स्वाती सूरजसिंग परदेशी, रामकृष्ण बापूराव पाटील, महेश प्रभाकर देशमुख, नीलिमा विश्वनाथ (रवि) पाटील यांचा समावेश असून, या गटाच्या गटनेतेपदी महेश प्रभाकर देशमुख, उपनेते म्हणून नीलिमा पाटील आणि प्रतोद म्हणून स्वाती परदेशी यांची निवड करण्यात आली आहे.

दोन्ही गट माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्याने नगरपरिषदेत स्पष्ट आणि स्थिर बहुमत प्राप्त झाले आहे. या राजकीय यशामुळे मित्रपरिवार आघाडी तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *