फार्मसी महाविद्यालयास सिप्ला लिमीटेड कंपनीचे संचालकांची सदिच्छा भेट  “देशाचे भवितव्य संशोधन व तंत्रज्ञानावर अवलंबून दादासाहेब पानगव्हाणे “
1 min read

फार्मसी महाविद्यालयास सिप्ला लिमीटेड कंपनीचे संचालकांची सदिच्छा भेट “देशाचे भवितव्य संशोधन व तंत्रज्ञानावर अवलंबून दादासाहेब पानगव्हाणे “

Loading

फार्मसी महाविद्यालयास सिप्ला लिमीटेड कंपनीचे संचालकांची सदिच्छा भेट

“देशाचे भवितव्य संशोधन व तंत्रज्ञानावर अवलंबून दादासाहेब पानगव्हाणे “

अमळनेर प्रतिनिधी
स्पर्धेच्या युगात आर्टिफिशिअल इंटेलीशन्स आणि डिजीटल तंत्रज्ञान यामुळे शैक्षणिक क्षेत्रात नवनविन क्रांती घडत आहे, संशोधन आणि नवनिर्मिती हे व्यवसायिक शिक्षणाचे अविभाज्य घटक आहेत असे मत व्यक्त करतांना पानगव्हाणे म्हणालेत की, माझ्या उच्चशिखरापर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आत्मविश्वासाची पायाभरणी प्राचार्य गुरुवर्य डॉ रविन्द्र सोनवणे यांनी माझ्या विद्यार्थीदशेत असतांनाच केलेली आहे. खान्देश शिक्षण मंडळ संचलित फार्मसी महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
अभ्यासूवृत्ती, कल्पकता, नाविन्याची आवड, ध्येय प्राप्त करण्याची जिद्द आणि कठोर परीश्रम करण्याची तयारी असेल तर जीवनात यश निश्चीतपणे प्राप्त होते असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविन्द्र सोनवणे यांनी महाविद्यालयीन प्राध्यापकांसमवेत झालेल्या चर्चेदरम्यान व्यक्त केले.
मान्यवरांचा परिचय करुन देतांना महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक अनिल बोरसे म्हणालेत की, शैक्षणिक क्षेत्रात संशोधन आणि समाजोपयोगी यांत्रिक, तांत्रिक साधनांचा आलेख वर्षानुवर्षे वाढता असला पाहीजे.
कार्यक्रमाची सांगता करतांना, खा.शि. मंडळाचे संचालक व फार्मसी विभागाचे चेअरमन योगेशजी मुंदडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, प्राचार्य डॉ. रविन्द्र सोनवणे यांनी औषधनिर्माण क्षेत्रातील पानगव्हाणे यांच्या सारख्या नामवंत व्यक्तींना महाविद्यालयात पाचारण करुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व संशोधनात्मक दृष्टीकोन सदैव तेवत ठेवावा.
मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी पदविका व पदवी फार्मसीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थत होते. कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण होणेसाठी प्रा. देवेश भावसार, सर्व शिक्षकवृन्द यांनी परिश्रम घेतलेत. प्रा. हर्षदा पवार यांनी सर्वांचे आभार मानलेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *