ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात साने गुरुजींची जयंती उत्साहात साजरी*
1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात साने गुरुजींची जयंती उत्साहात साजरी*

Loading

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात साने गुरुजींची जयंती उत्साहात साजरी*

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात थोर शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेचे सुपरवायझर आदरणीय श्री. पालवे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साने गुरुजींना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सी. बी. कोळी सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या जीवनकार्यावर आधारित विचार मांडून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव केला.

संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या प्रसंगी शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साने गुरुजींचे विचार आत्मसात करून जीवनात अंगीकारण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *