स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले व वेगवेगळ्या शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर बी ठाकरे हे होते. यावेळी पर्यवेक्षिका प्रा स्वाती बऱ्हाटे व समन्वयक प्रा उमेश पाटील उपस्थित होते. वेगवेगळ्या ठिकाणी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती व महाविद्यालयातील सोई सुविधा याबद्दलची माहिती प्रा आर बी ठाकरे यांनी अध्यक्षीय भाषणात मांडली. यावेळी माजी विद्यार्थ्यांसाठी व्हॉटस ॲप ग्रुप सुरू करण्यात आला. यावेळी डॉ श्रद्धा पाटील, तनिष्क खडके व पार्थ देशपांडे या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा योगेश धनगर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा प्रमोद भोई, प्रा छाया चौधरी , प्रा प्रज्ञा पाटील , प्रा छाया पाटील, डॉ अतुल इंगळे , प्रा दिनेश महाजन, प्रा अर्जुन मेटे, डॉ जयंत इंगळे व प्रा दिपक चौधरी यांनी मेहनत घेतली.

